Dragon Fruit and Avocado Agrowon
ॲग्रो विशेष

Integrated Horticulture Subsidy : ‘एकात्मिक फलोत्पादन’मधून ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडो, मसालापिकांना अनुदान

District Superintendent Agriculture Officer : सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे. या योजनेतून ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडो, मसाला पिकांना अनुदान मिळणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १३०.०५ लाख रुपये कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे.

सदर योजनेतील घटक ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडो, सुटी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाउस, हरितगृह, प्लॅस्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर २० एचपीपर्यंत, पॉवर टिलर आठ एचपीपेक्षा जास्त व कमी,

पीक संरक्षण उपकरणे, पॅक हाउस, पूर्वशीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी / फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर इत्यादी घटकांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोसले यांनी केले आहे.

...हे आहेत निकष

- या घटकाचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार.

- शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.

-शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT