
Solapur News : जिल्ह्यात फलोत्पादन व भाजपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्याकरिता कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडोसारख्या नवीन पिकांससह शेडनेट, हरितगृह, पॅकहाउससारख्या योजनांचा त्यात समावेश आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम या योजनेसाठी जिल्ह्यास १४८६.३१ लाख रुपयांचा कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे. मंजूर कार्यक्रमांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गास रक्कम ८८.८७ लाख व अनुसूचित जमाती प्रवर्गास रक्कम ६३.८७ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.
या योजनेतून ड्रॅगन फ्रूट, ॲवोकॅडो, सुटी फुले, मसाला पिके, फळबाग पुनरुज्जीवन सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरिकरण, शेडनेट हाउस, हरतिगृह, प्लॅस्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी ॲण्टी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर २० एचपीपर्यंत,
पॉवर टिलर आठ एचपीपेक्षा जास्त व कमी, पीक संरक्षण उपकरणे, पॅक हाउस, पूर्व शीतकरणगृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी व फिरते विक्री केंद्र-शीतचेंबरच्या सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर व भाजीपाला रोपवाटिका इत्यादी घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
इथे करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे नावे स्वत:ची शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.