Onion Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop : कांदा पिकात सिंचनाची लगबग

Onion Irrigation Management : खानदेशात कांदा पिकाची स्थिती बरी आहे. परंतु वारंवार तयार होणारे ढगाळ वातावरण, विषम हवामान यामुळे पिकात बुरशीजन्य व अन्य समस्या तयार होत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कांदा पिकाची स्थिती बरी आहे. परंतु वारंवार तयार होणारे ढगाळ वातावरण, विषम हवामान यामुळे पिकात बुरशीजन्य व अन्य समस्या तयार होत आहेत. यामुळे फवारणी व सिंचनासंबंधी काटेकोर व्यवस्थापन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खानदेशात यंदा कांद्याची लागवड घटली आहे. सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड अपेक्षित होती. परंतु लागवड सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. कारण पाऊसमान कमी राहिल्याने सर्वत्र जलसाठे कमी आहेत.

विहिरी, कूपनलिकांचे पाणी नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर, शहाद्यातील काही भागासह धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, जळगावातील पारोळा, भडगाव, बोदवड आदी क्षेत्रात जानेवारीतच झपाट्याने घटले आहे.

पाणी मुबलक नसल्याने अनेकांनी लागवड टाळली आहे. तर काहींनी लागवड कमी केली आहे. कांद्याऐवजी चारा पिकांची त्यातही कमी पाण्यात व लवकर हाती येणाऱ्या चारा पिकांची पेरणी केली होती. यामुळे कांद्याची लागवड सर्वत्र कमी झाली आहे.

याशिवाय दर ऑक्टोबरमध्ये काही दिवस स्थिर होते. नंतर दरात सुधारणा झाली नाही. दरांवर दबाव होता. या अस्थिर चित्रामुळेही अनेकांनी कांदा लागवड केली. कांद्याचा खर्चही आता मंजुरी व खतांचे दर वाढल्याने अधिक झाला आहे. यात काही शेतकऱ्यांनी पिकातून नफा मिळेल यातून लागवड केली आहे.

जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल या भागात कांदा पीक आहे. धुळ्यातील धुळे, साक्री भागातही लागवड झाली आहे. नंदुरबारात नंदुरबार व नवापूर भागात कांदा पीक आहे. अनेकांनी जानेवारीच्या सुरुवातीलाही लागवड केली. काही शेतकऱ्यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला लागवड केली आहे.

पीक अडीच ते दीड महिन्याचे आहे. त्यात पक्वता येऊ लागली आहे. परंतु जानेवारी व या महिन्यात ऐन वाढीच्या पीक विकासाच्या कालावधीत ढगाळ व विषम वातावरण आहे. पहाटे गार वारा, दुपारी उकाडा अशी स्थिती असते. यात सिंचनासंबधी योग्य नियोजन करावे लागत आहे.

कारण पाऊस आल्यास पिकात हानी होऊ शकते. यातच मध्येच वीज बंद असते. त्यात उष्णताही वाढू लागली आहे. यामुळे पिकास पाण्याचा अधिकचा ताणही देणे शक्य नाही. यातही शेतकऱ्यांची सर्कस होत आहे. ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे बुरशीजन्य रोग सक्रिय होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT