Crop Irrigation Management : या अवस्थेत द्या रबी पिकांना पाणी

Team Agrowon

पाण्याचे काटेकोर नियोजन

पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वाढीच्या संवेदनशील काळात सिंचन अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे.

Crop Irrigation Management | Agrowon

फुलोरा अवस्था महत्वाची

पाण्याची उपलब्धता असल्यास फुलोरा अवस्थेत पिकाला अवश्य सिंचन करावे.

Crop Irrigation Management | Agrowon

ज्वारी

लागवडीनंतर साधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी पीक फुलोऱ्यात येते. या अवस्थेत सिंचन केल्यास कणसात दाणे भरण्यास मदत होते

Crop Irrigation Management | Agrowon

गहू

भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाणी, मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.

Crop Irrigation Management | Agrowon

हरभरा

जिरायती हरभरा क्षेत्रात ओलावा खूप कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर फुले येऊ लागताच पाणी द्यावे.

Crop Irrigation Management | Agrowon

सूर्यफूल

पिकास संवेदनशील अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. रोपावस्था, फुलकळी, फुलोरा, दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

Crop Irrigation Management | Agrowon

करडई

करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस कमी पाणी लागते.

Crop Irrigation Management | Agrowon
आणखी पाहा...