Nagpur News: यंदा खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात कर्जवाटपाची गती मंदावल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात एकूण १ हजार ९०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे लक्ष्य होते. मात्र १५ नोव्हेंबरपर्यंत खरीप कर्जाचे ७१ टक्के, तर रब्बी कर्जाचे केवळ २० टक्केच वितरण होऊ शकले. .चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात १ लाख ६० हजार १०० शेतकऱ्यांना १ हजार ९०० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगाम संपला असून रब्बीच्या पेरण्याही जवळपास आटोपत आल्या आहे. चालू आर्थिक वर्षात १५ नोव्हेंबरपर्यंत खरिपात १ लाख २६ हजार ३५० शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटींच्या कर्जाचे लक्ष्य होते. त्यापैकी ७१ टक्के म्हणजे १ हजार ६० कोटी ९७ लाख रुपये वितरित करण्यात आले. .Crop Loan Distribution: अमरावतीत रब्बी हंगामात बारा टक्के पीककर्जाचे वितरण.मात्र रब्बी हंगामात ३३ हजार ७५० शेतकऱ्यांना ४०० कोटींचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ २० टक्के म्हणजे ७९ कोटी ११ लाखांचेच कर्जवाटप होऊ शकले. गेल्या वर्षी याच कालावधीतील रब्बी हंगामात ५३ टक्के कर्जाचे वितरण झाले होते. यंदाचा वेग अत्यंत कमी आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान, बघता रब्बी हंगामासाठी खते, बी-बियाणे, मजुरी आणि मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. परिणामी कर्जवाटपाची टक्केवारी वाढेल, असे वाटत होते. मात्र, चित्र नेमके उलटे आहे..लक्ष्यपूर्तीत अडथळारब्बी हंगामातील कर्जवाटपातील मंद गतीमुळे एकूण लक्ष्यपूर्तीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. बँकांमधील तांत्रिक अडचणी, प्रस्ताव पडून राहणे, भू-नोंदी अद्ययावत नसणे यासारख्या कारणांमुळे रब्बी कर्ज वितरणात विलंब होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले. जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना कर्ज प्रस्तावांची जलदगतीने छाननी व मंजुरी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत..Crop Loan: अतिवृष्टिग्रस्तांच्या पीककर्ज वसुलीला स्थगिती.कर्जमाफीचे आश्वासन अन् संख्येत वाढअनेकांनी कर्जमाफीच्या प्रलोभनाने घेतलेल्या कर्जाची परतफेडच केली नाही. परिणामी रिनिवल कर्जाची टक्केवारी घसरली. हंगामाच्या शेवटपर्यंत आकडा वाढेल मात्र गत वर्षीच्या तुलनेत फार कमी असले, असे जिल्हा शिखर बँकेच्या वतीने सांगण्यात आले..गतवर्षी रब्बीत ११३ टक्के कर्जवाटपगतवर्षी खरिपात १ हजार ५०० तर रब्बी हंगामात ४०० असे एकूण १ हजार ९०० कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यात खरिपात ६५ टक्क्यांवर कर्जवितरण झाले होते. रब्बी हंगामात हा आकडा वाढून ११३ टक्क्यांवर पोहोचला होता. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांची सरासरी ७५ टक्के एवढी राहिली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.