Parbhani News: इक्रिसॅटने अर्ध कोरडवाहू क्षेत्रासाठी विकसित केलेले तंत्रज्ञान व पीक पद्धतीमुळे गुणात्मक सुधारणेस हातभार लागत आहे. इक्रिसॅटचे उपयुक्त तंत्रज्ञान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील..त्यामुळे संशोधनाची गुणवत्ता वृद्धिंगत होईल. विद्यार्थी, संशोधकांना जागतिक स्तरावरील सुविधा मिळतील तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाचा थेट लाभ होऊ शकेल, असे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी सांगितले..Bio Pesticide Conference: ‘राष्ट्रीय जैव कीटकनाशक परिषदे’चे आसाम कृषी विद्यापीठात आयोजन.शनिवारी (ता. २९) डॉ. इंद्रमणी यांनी हैदराबाद (पट्टणचेरी) येथील आंतरराष्ट्रीय अर्धकोरडवाहू उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रीसॅट) येथे अभ्यास भेट दिली. त्यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, ‘‘ही अभ्यास भेट मराठवाड्यातील कृषी संशोधनाला नव-उर्जा देणारी ठरणार असून शाश्वत शेती, पिकांचे हवामान-प्रतिरोधक प्रकार, उच्च उत्पादनक्षम वाण विकसित करण्यासाठी मोठी मदत होणार आहे..Punjabrao Deshmukh University: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २१७३ पदे रिक्त.परभणी कृषी विद्यापीठ आणि इक्रिसॅट यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होईल. शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग खुले होऊ शकतील.’’ या भेटीदरम्यान डॉ. इंद्रमणी यांनी इक्रिसॅटमधील आत्याधुनिक वैज्ञानिक सुविधा, प्रयोगशाळा, आधुनिक संशोधन पद्धतींची सखोल माहिती घेतली. .विशेषतः जीनोमीक्स लॅब, प्री ब्रीडिंग लॅब, पीटीटीसी, लीसे स्कॅन सुविधा, स्पीड ब्रिडिंग प्लॅटफॉर्म, क्लायमेट चेंज संशोधन सुविधा आणि जीन बँक यांना भेट दिली. या वेळी रिसर्च कॅम्पसवरील अधिकाऱ्यांनी परभणी कृषी विद्यापीठास आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, साधनसामग्री तसेच संशोधन सहकार्य देण्याची तयारी दर्शविली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.