Chana Irrigation Management : हरभऱ्याला स्प्रिंकलरने पाणी देण्याचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

हरभरा पीक पाण्याला संवेदनशील

हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीन पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास पीक उभळत म्हणजेच पिकाची शाखीय वाढ जास्त होते आणि घाटे कमी लागतात. 

Chana Irrigation Management | Agrowon

पाण्याची गरज

हरभरा पिकाला साधारणपणे २५ सेंटीमीटर पाण्याची गरज असते. ही पाण्याची गरज साध्य होते ती तुषार सिंचनाने. 

Chana Irrigation Management | Agrowon

जमिन भुसभुशीत राहते

जमिन भुसभुशीत राहते. स्प्रिंकलरने पिकाला पाहिजे तेवढे आवश्यक त्या वेळेला पाणी देता येतं. 

Chana Irrigation Management | Agrowon

तणांचा प्रादुर्भाव कमी होतो

पिकातील तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Chana Irrigation Management | Agrowon

मूळकूज रोग नियंत्रण

मूळकूज रोग नियंत्रणात राहतो. मूळकूज हा हरभऱ्यातील प्रमुख रोग आहे. या रोगामुळे हगरभऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.  

Chana Irrigation Management | Agrowon

वाफसा स्थिती

तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळे पिकाला दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमताही वाढते. 

Chana Irrigation Management | Agrowon

खतांची उपलब्धता

पिकाची अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाण्यामुळे पिकाला दिलेली खते, अन्नद्रव्य वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते.

Chana Irrigation Management | Agrowon
आणखी पाहा...