Amravati News: अंजनगावसुर्जी येथे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक नगरपरिषद निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने स्थगिती मिळाली. त्यामुळे प्रभाग चारच्या उमेदवार व त्यांचे सूचक असलेल्या पतीने राज्य निवडणूक आयोगाकडे झालेल्या खर्चाची भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन निवडणूक अधिकारी यांना देण्यात आले..नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर अनेक स्थित्यंतरे पाहण्यास मिळाली. मात्र ३० नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने अंजनगावसुर्जी नगरपरिषदेच्या निवडणुकीस स्थगिती देण्यात आली. दरम्यान, शेवटच्या टप्प्यावर आलेल्या निवडणूक स्थगितीच्या निर्णयाने अनेक उमेदवार व त्यांच्या समर्थकांना धक्का बसला. यादरम्यान सर्वच उमेदवारांना आर्थिक भार सोसावा लागला. प्रभाग चारमधील गट अ मधून नगरसेवकपदाकरिता (उबाठा) शिवसेना पक्षाकडूनउमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मोनिका येऊल यांचे पती व सूचक असलेले श्याम येऊल यांनी निवडणूक अधिकारी यांना आपल्या अर्धांगिनीची व्यथा व्यक्त करीत खर्चाचीतरतूद करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली..Local Body Elections: ...आता निकालाकडे लक्ष; २१ला मतमोजणी.त्यांनी दिलेल्या निवेदनात, मी प्रभाग चारमधील गट ‘अ’मधून नगरसेवकपदाकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत प्रचार साहित्य व इतर संसाधनांवर तसेच आगाऊ दिलेल्या रकमेवर जवळपास तीन लाख ४८ हजार इतका खर्च झालेला आहे..Local Body Election: बुलडाणा जिल्ह्यात वाढत्या मतदानाने उमेदवारांत धाकधूक.मी गृहिणी असून माझ्याकडे उत्पन्नाचे कोणतेही पुरेसे साधन नाही. विभागातील लोकांकडून तसेच नातेवाइकांकडून उधार उसनवार करून निवडणूक खर्च केला आहे. निवडणूक आयोगाकडून काही नगरपरिषदांची निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे वाढलेल्या कालावधीपावेतो प्रचार व जनसंपर्क करण्याकरिता कोणतीही आर्थिक तरतूद माझ्याकडे नाही..म्हणून निवडणूक आयोगाने होणाऱ्या संभावित खर्चाची तरतूद करावी. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे उमेदवारास मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आजरोजी निवडणूकआयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे उमेदवारांचे वित्तीय तसेच जीवितहानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आयोगावर राहील, असे नमूद केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.