Cotton Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Variety : कपाशीच्या ‘त्या’ वाणांचा साठा संपुष्टात

Cotton Seeds : गेले काही दिवस कपाशीच्या काही विशिष्ट वाणांच्या मागणीवरून जिल्ह्यात गदारोळ तयार झालेला आहे. बियाणे मिळवण्यासाठी शेतकरी रांगामध्ये उभे आहेत.

Team Agrowon

Akola News : गेले काही दिवस कपाशीच्या काही विशिष्ट वाणांच्या मागणीवरून जिल्ह्यात गदारोळ तयार झालेला आहे. बियाणे मिळवण्यासाठी शेतकरी रांगामध्ये उभे आहेत. काही ठिकाणी हमरीतुमरीचेही प्रकार घडले. या सर्व घडामोडीत ‘ते’ मागणी असलेले बियाणे संपूर्णतः संपुष्टात आल्याची माहिती विक्रेत्यांच्या संघटनेने जिल्‍हा प्रशासनाला कळवली आहे. यामुळे येत्या काळात आणखीच वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कपाशीच्या दोन वाणांची अकोला जिल्ह्यात मोठी मागणी असून १६ मे पासून त्यासाठी दररोज रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अकोल्यात तर विक्रेत्यांच्या दुकानांसमोर रात्रीपासून शेतकरी आपला नंबर लावून थांबत होते. मंगळवारी (ता.२८) अकोल्यात आक्रोश वाढल्याने विक्रेत्यांनी दुकाने बंद केली तर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता.

कृषी अधिकारी, पोलिसांनी हस्तक्षेप करीत प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न केले.

ज्या वाणांच्या मागणीवरून गदारोळ सुरु होता त्या वाणांचा साठा अकोला जिल्हयात संपुष्टात आला आहे, अशी माहिती विक्रेत्यांनीच कळवली.

हजारो शेतकऱ्यांची वाणासाठी भटकंती

कपाशीचे ‘ते’वाण मिळावे यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी विक्रेत्यांच्या पायऱ्या झिजवत आहेत. बुधवारी (ता. २९) काही दुकानासमोर पहाटेपासूनच रांग लागलेली असल्याचे दिसून आले होते. गांधीग्राम येथून आलेले गोविंदराव सरोदे म्हणाले, बियाण्याची टंचाई आहे कुठे. शेजारच्य जिल्हयात, तालुक्यात बियाणे मिळते. आम्ही खर्च करून तेथे जाऊ शकत नाही. जिल्हयात विक्री झालेल्या बियाण्याची प्रशासनाने शहानिशा करायला हवी.

या संदर्भात बोलताना पदमा तरोड म्हणाल्या, की आपण तीन दिवसांपासून रांगेत दररोज उभे राहत आहोत. खारपाण पट्‍यात संबंधित वाण चांगले येत असल्याने आम्ही आग्रह करीत होतो. पण बियाणे मिळालेच नाही. दिलीप मुरुमकार म्हणाले, अकोला सारख्या शहरात दोन-तीन दुकानदारांकडेच माल का दिल्या गेला. बियाणे उपलब्ध असूनही देण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.

साठेबाजीची शंका

एकीकडे बियाणे संपुष्टात आल्याचे सांगितले जात असले तरी आडसूळ फाटा सारख्या ग्रामीण भागात जादा दराने बियाणे विक्री केले जात असल्याचा प्रकार पुढे आलेला आहे. ८६४ रुपयांचे पाकीट तब्बल १४०० रुपयाने त्या विक्रेत्याने देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे या बियाण्याची जिल्ह्यात काही विक्रेत्यांनी साठेबाजी केलेली असावी असा संशय शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. कृषी विभागाने प्रत्येक विक्रेत्याकडून विक्रीची तपशीलवार माहिती गोळा करण्याची गरजही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT