Pune News : देशात यंदा कापसाची आयात गेल्यावर्षीपेक्षा अडीच पटीने वाढणार आहे. जुलैपर्यंत देशात ३३ लाख गाठी कापूस आयात झाली. यामुळे देशात कापसाचा साठा वाढला. शिल्लक कापसाचे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा ४७ टक्क्यांनी वाढून ५७ लाख गाठींवर पोचणार आहे, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. याचा दबाव कापसाच्या नव्या हंगामात येणार आहे. .काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने आपला ऑगस्ट महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजात देशातील २०२४-२५ मधील कापूस उत्पादनाचा अंदाज ३११ लाख गाठींवर कायम ठेवला आहे. देशात कापसाचा एकूण पुरवठा ३८९ लाख गाठींवर झाल्याचे सीएआयचे म्हणणे आहे. देशात कापूस आयात वाढली आहे. .Cotton Cultivation: कापूस लागवड घटली अडीच लाख हेक्टरने.कापूस आयात ३९ लाख गाठींवर पोचेल. जुलैपर्यंत देशात ३३ लाख गाठी कापूस आयात झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आणखी ६ लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला. देशातील कापसाचा वापर ३१४ लाख गाठींवर पोचेले. तर कापूस निर्यात यंदा गेल्यावर्षीपेक्षा ३६ टक्क्यांनी कमी होऊन १८ लाख गाठींवरच स्थिरावेल, असेही सीएआयने आपल्या अहवालात म्हटले आहे..जुलैपर्यंत देशातील बाजारात ३०३ लाख गाठी कापूस आला होता. तर आयात ३३ लाख गाठी झाली. तर निर्यात १६ लाख गाठींची झाली. देशात जुलैच्या शेवटपर्यंत २६१ लाख गाठींचा वापर झाला. तर ९६ लाख गाठी कापूस शिल्लक आहे. यापैकी ३२ लाख गाठी कापूस मिल्सकडे आहे तर ६४ लाख गाठी कापूस सीसीआयसह शेतकरी आणि इतर घटकांकडे आहे, असे सीएआयचे म्हणणे आहे. देशात यंदा सीसीआयने सर्वाधिक कापूस खरेदी केला होता. सीसीआयने १०० लाख गाठींची खरेदी केली होती..Cotton Supplier Action: दर्जाहीन कापूस वेचणी, साठवणूक बॅगप्रकरणी कारवाई.आयात वाढलीदेशात यंदा कापूसाची आयात अपेक्षेपेक्षा वाढली आहे. गेल्यावर्षी कापूस आयात तब्बल अडीच पटीने वाढणार आहे. गेल्यावर्षी १५ लाख गाठी कापूस आयात झाला होता. मात्र चालू हंगामात ३९ लाख गाठी कापूस होण्याची शक्यता आहे. जुलैच्या शेवटपर्यंत देशात ३३ लाख गाठी कापूस आयात झाला आहे. या वाढत्या आयातीमुळे देशात शिल्लक कापसाचे प्रमाण वाढत आहे..लागवड घटलीदेशात मागील वर्षभर कापसाचा भाव दबवात राहीला. शेतकऱ्यांना बाजारात हमीभावही मिळाला नाही. त्यामुळे यंदा शेतकरी कापसाची लागवड कमी करतील असा अंदाज लावला जात होता. आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील कापूस लागवड साडेतीन टक्क्याने कमी झाली आहे. गेल्यावर्षी ११० लाख हेक्टरवर देशात कापसाची लागवड झाली होती. तर यंदा आतापर्यंत १०७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.