Rainfall Variability : राज्यात पडणारा पाऊस हा अनियमित आणि लहरी आहे. मागील काही वर्षांपासून पर्जन्याचे विचलन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे जाणवते आहे. त्याचा थेट परिणाम जनजीवन विस्कळीत होण्यावर होतो. देशभरात एकूण पंधरा कृषी हवामान प्रदेश आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा बराचसा भूभाग ‘डेक्कन प्लॅटू’ आणि कोकण किनारपट्टीचा भाग ‘कोस्टल रिजन’ असा संबोधण्यात येतो..राज्यातील टंचाईमहाराष्ट्रात सुमारे नऊ भागात कृषी हवामान प्रदेशाची विगतवारी करण्यात आली आहे. येथील पर्जन्य, मृदा, पीक पद्धती इत्यादी मानकांवर आधारित कृषी हवामान प्रदेश निर्धारित केले जातात.पश्चिम घाट भागाला लागूनच संक्रमण भाग एक आणि भाग दोन आहेत. या भागात सुमारे ७०० ते १२५० मिलिमीटर एवढा पाऊस दरवर्षी पडतो. त्यालगत असलेला आवर्षणाचा भाग येतो, त्याची व्याप्ती नंदुरबार ते सोलापूर अशी दीर्घ आहे. हा भाग महाराष्ट्राच्या पर्जन्यछायेचा भाग म्हणून समजण्यात येतो. महाराष्ट्रातील सुमारे ३० टक्के क्षेत्र पर्जन्यछायेच्या भागात येते..Rural Migration : ग्रामीण महाराष्ट्रातल्या स्थलांतराचा पॅटर्न.पर्जन्यछायेचा प्रदेशमहाराष्ट्राच्या मॉन्सूनवर मोठा परिणाम करणारा घटक म्हणजे अरबी समुद्र आहे. येथून येणारे ढग प्रभावी असतात. मॉन्सूनच्या कालावधीमध्ये अरबी समुद्राकडून येणारे ढग हे जलभारित असतात. ते पश्चिम घाटामध्ये अडवले गेल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. ढग जसे मार्गक्रमण करत वाऱ्याच्या दिशेने भूभागाच्या खालच्या भागात (लिवर भाग) येतात, तेथे त्यातील जलभार कमी होऊन अल्पवृष्टी होते, काही ठिकाणी पाऊस पडत नाही. येथील भौगोलिक स्थिती देखील परिणाम करणारी आहे.पर्जन्य छायेच्या लगतचा निश्चित पाऊस पडणारा प्रदेशपर्जन्यछायेच्या प्रदेशात सुमारे १३ जिल्हे येतात. प्रत्येक जिल्ह्यातील काही भाग हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. यामध्ये नंदुरबार, धुळेपासून सोलापूर, सातारा इथपर्यंतचा भाग येतो.यानंतर लगेचच येणारा हा निश्चित पावसाचा प्रदेश हा देखील ३५ टक्के भूभाग व्यापतो. निश्चित पाऊस असलेल्या प्रदेशात देखील पर्जन्याचे विचलन अधिक आढळते. म्हणजेच पर्जन्य छायेचा आणि निश्चित पर्जन्याचा प्रदेश एकत्रित केला तर महाराष्ट्रातील सुमारे ६५ टक्के भूभाग यामध्ये समाविष्ट होतो..पर्जन्याचे विचलन आणि स्थलांतरगेल्या काही वर्षांमध्ये निश्चित पावसाचा प्रदेशात पर्जन्याचे विचलन खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहे (२०१२,२०१५,२०१८). याचा जनजीवनावर परिणाम व्यापक आहे. याच भागातून अधिक स्थलांतर होत असल्याचे निदर्शनास येते.सुरुवातीस हंगामी असलेले स्थलांतर नंतर कायम होते. जेथे पाणी आहे, उद्योग-व्यवसाय आणि रोजगाराची शाश्वती आहे, अशा भागांमध्ये म्हणजे गुजरात, नाशिक, पुणे, मुंबई आणि तत्सम महानगराकडे स्थलांतराचा ओघ जास्त आहे. गेल्या पन्नास वर्षांमध्ये याचे प्रमाण खूप वाढले आहे, ही चिंता करण्यासारखी बाब आहे.महाराष्ट्रात सरासरी पर्जन्य हे समाधानकारक आकडेवारी देणारे असले तरी वर उल्लेख केलेल्या भागांमध्ये त्याची विगतवारी भिन्न आहे. काही ठिकाणी २०० मिलिमीटर तर काही ठिकाणी सातशे ते साडेसातशे मिलिमीटर पाऊस पडतो.अवर्षण किंवा दुष्काळ महाराष्ट्राला नवीन बाब नाही. गेल्या अनेक शतकापासून महाराष्ट्र या ठिकाणी भक्कमपणे पाय रोवून उभा आहे. पर्जन्याच्या अनुकूल तेथील पीक पद्धती आणि जनजीवन आढळते.स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये सिंचनाकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यामुळे पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात सिंचनासाठी जलाशयांची निर्मिती झाली आहे. अतिवृष्टीच्या काळात जलाशयामध्ये पाणी साठवून ठेवून ते पावसाळ्यानंतर आवश्यकतेप्रमाणे सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात येत असते. पुराची तीव्रता कमी करणे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे, हे याचे प्रमुख उद्देश आहेत..लघू सिंचन आणि कृषी हवामान प्रदेशपर्जन्यछायेचा प्रदेश आणि निश्चित हवामानाचा प्रदेशामध्ये विशेषतः पश्चिम घाटाच्या पायथ्याकडील जे अवर्षण प्रवण क्षेत्र आहे, त्या भागात मोठ्या प्रमाणावर लघू सिंचन तलाव निर्माण करण्यात आले आहेत. काही पूर्वापार आहेत तर काही १९७२ काळातील प्रखर दुष्काळानंतर निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये शंभर हेक्टर ते अडीचशे हेक्टर सिंचन क्षमता असलेले तलाव मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात आले आहेत. त्याची आकडेवारी सुमारे एक लाख सात हजार एवढी आहे. याच कालावधीमध्ये तत्कालीन शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे उदाहरणार्थ रोजगार हमी योजनेची निर्मिती आणि त्याच्या माध्यमातून लघू सिंचनात करण्यात आलेले काम या धोरणात्मक निर्णयामुळे गावोगावी लघू सिंचन तलावाची निर्मिती झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने माती नालाबांध यांची संख्या अधिक भरते. याची जलजनगणना झालेली नाही किंवा त्यांची संख्या जलजणगणनेमध्ये दर्शविण्यात आलेली नाही. हे प्रमाण लक्षणीय आहे. त्याचा विचार विकेंद्रित जलसिंचनाच्या बाबतीमध्ये करणे अपरिहार्य ठरते. यासाठी शासनाने निश्चित धोरण ठरवून अशा निर्माण झालेल्या मत्तांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करून त्यासाठी निश्चित दिशा देणे गरजेचे आहे..Labour Migration : सातपुड्यातील मजुरांचे स्थलांतर.अशा सिंचन तलावामध्ये अथवा मातीनाला बांध, त्यामध्ये मागील पन्नास वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून यातील गाळ काढणे हे शक्य झाले नाही किंवा अत्यंत अल्प काम झालेले आहे. कारण अशा तलावांची नोंद फार कमी ठिकाणी झाल्याचे निदर्शनास येते. काही संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून येथील गाळ काढून जलसाठा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या छोट्या प्रयत्नांमुळे पर्जन्यछायातील गावे ही जल परीपूर्ण झालेली आढळतात. गावांचे टँकरवर अवलंबून असण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे निदर्शनास येते..सक्षम वितरण प्रणालीया भागामध्ये शक्यतो परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर येतो. यासाठी जलसाठे सुस्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा स्थितीमध्ये खरी गरज आहे ती उपलब्ध पाणी हे काटकसरीने वापरणे. या लघू सिंचन तलावाच्या माध्यमातून अथवा सिंचन तलावाच्या माध्यमातून होणारी वितरण प्रणाली ही सक्षम आणि अभेद्य असणे गरजेचे आहे. वितरण प्रणाली सदोष असल्यास त्यातील पाण्याचे वहन हे परिपूर्ण होत नाही. वहनातून होणारी गळती ही विपरीत परिणाम करणारी ठरते. म्हणून येथे सहभागी सिंचन पद्धतीचे महत्त्व अधोरेखित होते..भूपृष्टजलाचे प्रदूषण आणि पाण्याचा पुनर्वापरस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेषतः ग्रामपंचायती आणि नगरपंचायतीमध्ये घनकचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेची नीट घडी बसवणे गरजेचे आहे. निघालेला घनकचरा कुठे टाकायचा, हा एक मोठा प्रश्न ग्रामपंचायती समोर असतो. घंटागाडीच्या माध्यमातून घरातून कचरा उचलतात, पण त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाही, असे बऱ्याच ठिकाणचे अहवाल आहेत. बऱ्याच वेळेस ते ओढ्याकाठी, नदीकाठी किंवा थेट नदीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते.घरातून निघालेले सांडपाणी, मैला पाणी हे गावातील तलाव, ओढा, नदी, नाला यामध्ये त्याचे विसर्जन होते. .या सर्व बाबी अंगवळणी पडलेल्या आहेत परंतु ही छोटीशी समस्या ज्यावेळेस सर्व पाणी एकत्रित येते त्या वेळेस ती अक्राळ विक्राळ स्वरूप धारण करते. मग ती समस्या सुटण्याच्या पलीकडे जाते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या स्वच्छ भारत अभियान आणि तत्सम योजनांचा अवलंब करून प्रदूषण नियमाने होणाऱ्या ठिकाणी त्याचे उत्तर शोधले गरजेचे आहे. म्हणजे प्रत्येक घरातून निघालेले सांडपाणी हे परसबागेमध्ये गेले पाहिजे किंवा एकत्रित करून तेथे त्याची प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे.बऱ्याच आदर्श गावांमध्ये ही व्यवस्था कार्यरत असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये अशा चांगल्या पद्धतीने काम काही ग्रामपंचायती करीत आहेत, तथापि हे व्यापक स्वरूपात होणे गरजेचे आहे. यासाठी येत्या ग्राहक सभा, ग्रामसभेमध्ये याबाबत निर्णय घेऊन त्यावर शाश्वत स्वरूपात उपाययोजना करणे गरजेचे आहे.९७६४००६६८३, (माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.