Seed Shortage : बियाणे तुटवड्यामागे कृषी खात्याची निष्क्रियता

Agriculture Department : कृषी विभागाच्या नियोजन्यशून्य कारभारामुळेच कापसाच्या एका वाणाचा तुटवडा निर्माण झाला.
Soybean Seed Shortage
Soybean Seed ShortageAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : कृषी विभागाच्या नियोजन्यशून्य कारभारामुळेच कापसाच्या एका वाणाचा तुटवडा निर्माण झाला. त्यातूनच शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करीत विभागीय कृषी सहसंचालकांसह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दर्यापूर तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येवदा परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण तूर्तास चौकशीत ठेवले आहे.

दर्यापूर तालुक्‍यातील येवदा परिसर हा खारपाणपट्ट्यात समावेशीत आहे. या भागातील शेतकरी उत्पादकतेसाठी कापसाच्या विशिष्ट वाणाचीच लागवड करतात. गेल्या अनेक वर्षांपासून एका कंपनीच्या विशिष्ट वाणाची मागणी या भागात होते. २०२३ मध्ये याच वाणाचा तुटवडा निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली होती.

Soybean Seed Shortage
Desi Cotton Seed Shortage : देशी, सरळ कापूस वाणांची टंचाई वाढणार

त्यासोबतच शेतकऱ्यांना देखील वाढत्या तापमानात बियाणे खरेदीसाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागले होते. कृषी सेवा केंद्रधारकांच्या नफेखोरीमुळेच हे प्रकार दरवर्षी घडतात आणि त्याला कृषी खात्यातील अधिकाऱ्यांचे समर्थन राहते, असा आरोप शेतकऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. तुटवडा दर्शविल्यास त्या आडून जादा दराने बियाणे विकता येते. त्यामुळेच अशाप्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कृत्रिम बियाणे टंचाईबाबत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांच्याकडून कारवाई होत नाही. त्यामुळेच त्यांच्याच आशीर्वादाने हे प्रकार सुरू असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे येवदा पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत कृत्रिम बियाणे टंचाईची चौकशी करून या बियाणे माफियांचा पर्दाफाश करावा, अशीही मागणी आहे.

Soybean Seed Shortage
Cotton Seed Shortage : देशातील काही भागांमध्ये बीटी कापूस बियाण्याची टंचाई

पोलिसांनी याची केवळ नोंद घेतली असून याप्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. निवेदनकर्त्यांमध्ये मयूर वांदे, विशाल गायगोले, अक्षय तिडके, पंकज कान्हेरकर, चेतन तिडके, हरीश मानकर, नरेंद्र मानकर यांच्यासह ५० शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कायद्याच्या अंमलबजावणीत अपयशी

शेतकऱ्यांना अपेक्षित बियाणे मिळावे यासाठी उपाययोजनांवर भर देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणे देखील अपेक्षित आहे.

परंतु त्यात कृषी विभाग अपयशी ठरल्याने याप्रकरणी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, दर्यापूर तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार, कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर, पंचायत समितीचे गुणनियंत्रण अधिकारी सुरेश रामागडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com