विवेक चौधरी
Poultry Management : नवीन व्यवसाय म्हटले, की माणूस एका नव्या उमेदीने उतरलेला असतो. आता कधी एकदा फार्म उभा राहतोय असे आम्हाला झाले होतं. पण कदाचित देवाने आमची परीक्षा घेण्याचे ठरवले होते. शेडचे काम सुरू झाले आणि दोन महिन्यांतच कोरोनामुळे लॉकडाउन लागले. लगबगीने सुरू असलेली कामे संथ झाली.
काही काळासाठी थांबलीसुद्धा. पण माझे वडील सुभाषराव फार जिद्दी आणि हुशार होते. त्यांनी काम बंद पडू दिले नाही. त्यात भाऊ नितीन हा इंजिनिअर असल्याने त्याच्या मदतीने वडिलांनी काही लोकांना सोबत घेऊन स्वत: काही कामे केली. या सगळ्या कामांत आई सौ. संगीता हिची देखील मदत झाली. हायटेक पोल्ट्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे पूर्ण कुटुंबच कामाला लागलेले होते.
सुरुवातीचा काळ कसोटीचा
लॉकडाउन थोडा शिथिल झाल्यानंतर बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर सर्व यंत्रसामग्रीची खरेदी करून ती बसविण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी गेला. तरी छोटीमोठी कामे बाकी होती. तरीदेखील कुक्कुटपक्ष्यांची पहिली बॅच घेण्याचे ठरविले. त्यानुसार १८ जुलै २०२० मध्ये फार्ममध्ये २० हजार पक्ष्यांची पहिली बॅच घेतली. खरी कसोटी आता सुरू झाली होती. कारण आम्ही ईसी फार्मचा फक्त कागदोपत्री अभ्यास केला होता. कसलाही अनुभव गाठीशी नव्हता. पण हार न मानता जिद्द आणि कष्ट करण्याची शंभर टक्के तयारी ठेवली होती.
सुरुवातीला पहिली बॅच साधारणपणे २० हजार पक्ष्यांची आली. या व्यवसायात पक्षी येण्याआधीच आपल्याला ८० टक्के तयारी करावी लागते, हे ऐकून होतो. खाद्य, पाण्याची भांडी आधीच भरून ठेवावी लागतात. याबाबत आम्हाला पूर्ण माहिती नव्हती. पहिल्या बॅचमधील पक्षी फार्मवर आल्यानंतर खूप तारांबळ उडाली. सर्व बाबींचे योग्य नियोजन करून मी वडील, भाऊ आणि आई आम्ही तिघे अक्षरशः दुसऱ्या दिवशीच घरी गेलो. तेव्हा वाटले हा व्यवसाय वाटतो तितका सोपा नाही. सुरुवातीचे दोन दिवस आम्हाला झोप नव्हती, की जेवणाचे ध्यान नव्हते.
चुकांमधून शिकलो
पोल्ट्री व्यवसायातील कोणताही पूर्वानुभव नसताना कुटुंबीयांच्या साथीने पहिली बॅच पूर्णत्वास नेली. चुकांमधून पुढे शिकत गेलो. येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून आवश्यकतेनुसार व्यवस्थापनात योग्य बदल केले. वेळोवेळी अनुभवी पोल्ट्री व्यावसायिकांशी संवाद साधत आम्हाला येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. दैनंदिन खाद्य, पाणी व्यवस्थापन, मरतुक रोखत पक्ष्यांचे अपेक्षित वजन मिळविण्यात यश मिळाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.