Poultry Disease : कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजारावर उपाययोजना

Poultry Management : कोंबड्यांच्या विविध विषाणूजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण हे उपचारापेक्षा अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य जैवसुरक्षा आणि चांगल्या व्यवस्थापन पद्धतींमुळे पोल्ट्री फार्ममधील आजाराचा प्रादुर्भाव कमी होतो. शेड व्यवस्थापन आणि स्वच्छता राखल्यास या आजाराचा प्रसार टाळता येतो.
Poultry Management
Poultry ManagementAgrowon
Published on
Updated on

Poultry Viral Disease : कोंबड्यांमध्ये एव्हियन इन्फ्लुएंझा, फाऊल पॉक्स, न्यूकॅसल डिसीज, इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस, संसर्गजन्य लॅरिन्गोट्राकायटिस, लिम्फॉइड ल्युकोसिस, इन्फेक्शियस बर्सल डिजीज आणि एव्हियन एन्सेफॅलोमायलिटिस यासारखे अनेक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा विषाणूजन्य आजार म्हणजे एव्हियन इन्फ्लूएंझा, फॉउल पॉक्स, न्यूकॅसल रोग, इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस आणि इन्फेक्शियस बर्सल डिसीज. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

फाऊल पॉक्स

  • फाऊल पॉक्स हा कोंबड्या, बदके, टर्की, आणि इतर पक्ष्यांमध्ये होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जगभरात आढळतो.

  • प्रामुख्याने त्वचेला तसेच श्वसनमार्गांना बाधित करतो. फाऊल पॉक्स आजारामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो.

लक्षणे

  • चोच, डोळे, पाय आणि तुऱ्यावर गडद रंगाचा फोड किंवा गाठी तयार होतात.जखमा वाळून चकते तयार होतात.पक्षी सुस्त होतो आणि खाण्याचे प्रमाण कमी होते.

  • तोंड, घसा, आणि श्वसनमार्गात गाठी तयार होणे.श्वसनास त्रास होणे (खोकल्यासारखे आवाज)

उपाययोजना

  • फाऊल पॉक्स लसीकरण करावे.

  • पिल्लांना ६ ते ८ आठवड्यांच्या वयात लस द्यावी.

  • डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता ठेवणे.

  • शेड नियमितपणे स्वच्छ ठेवणे.दूषित उपकरणे निर्जंतुक करावीत.

  • बाधित पक्ष्यांना निरोगी पक्ष्यांपासून दूर ठेवावे.

Poultry Management
Poultry Disease Management : कोंबड्यांमधील ‘ब्रूडर न्यूमोनिया’चे नियंत्रण

न्यूकॅसल आजार

  • एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर लसीकरणाद्वारे आजार नियंत्रित करता येतो. शेड व्यवस्थापन आणि स्वच्छता राखल्यास या आजाराचा प्रसार टाळता येतो.

प्रकार

  • न्यूकॅसल रोगाची तीव्रता विषाणूच्या स्ट्रेननुसार बदलते:

  •  व्हेलोजेनिक ः सर्वाधिक घातक, उच्च मृत्यूदर.श्वसन आणि मज्जासंस्थेवर परिणाम.

  •  मेसोजेनिक ः मध्यम तीव्रतेचा, अंडी उत्पादनात घट.

  •  लेंटोजेनिक ः सौम्य प्रकार, कमी तीव्रता, लसीकरणासाठी वापरला जातो.

लक्षणे

  • न्यूकॅसल आजाराची लक्षणे विषाणूच्या तीव्रतेनुसार बदलतात.

  • खोकल्यासारखा आवाज, नाकातून स्त्राव येतो.

  • श्वास घेताना कणकण आवाज, मान वळवतात.

  • तोल जाऊन पडणे. शरीरावर ताबा कमी होणे.

  • भूक कमी होते. हिरव्या रंगाचा अतिसार.

उपाययोजना

  • आजार टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • पिल्लांना पहिली लस १-७ दिवसांच्या वयात आणि दुसरी लस ४ ते ६ आठवड्यांनंतर द्यावी.

  • शेड स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावी.

  • बाहेरचे पक्षी किंवा व्यक्तींना शेडमध्ये प्रवेश बंद करावा.

  • इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस

  • इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस हा कोंबड्यांमध्ये होणारा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. हा आजार श्वसनसंस्थेवर, पचनसंस्थेवर आणि प्रजननसंस्थेवर देखील परिणाम करतो.

Poultry Management
Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

लक्षणे

  • खोकला आणि छातीशी कणकण आवाज.सर्दी आणि नाकातून स्त्राव.

  • डोळ्यांतून पाणी वाहते.अंड्यांचे उत्पादन कमी होणे.

  • अंड्यांचा आकार लहान आणि कवच पातळ होणे.

उपाययोजना

  • वेळेवर लसीकरण करावे.

  • पिल्लांना पहिली लस १ ते २ आठवड्यांच्या वयात द्यावी. पुनर्लसीकरण ६ ते ८ आठवड्यांनी किंवा फार्मच्या वेळापत्रकानुसार करावे.

  • इन्फेक्शियस बर्सल डिजीज

  • या आजाराला गंबोरो देखील म्हणतात. अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करून त्यांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवतो.

लक्षणे

  • पाण्यासारखी पांढऱ्या रंगाची किंवा पिवळसर विष्ठा. वजन कमी होते.

  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ज्यामुळे दुय्यम संसर्ग होतो.

  • बाधित कोंबडीची रोगप्रतिकारक शक्ती घटल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढते.

  • लसीकरणाचा प्रभाव कमी होतो. अंड्यांचे उत्पादन घटते.

उपाययोजना

  • वेळेवर लसीकरण करणे गरजेचे आहे.

  • पहिली लस २ ते ३ आठवड्यांच्या वयात द्यावी.शेडमध्ये आजाराचा धोका असल्यास पुनर्लसीकरण करावे.

  • कोंबड्यांच्या विविध विषाणूजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण हे उपचारापेक्षा अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य जैवसुरक्षा आणि चांगल्या व्यवस्थापन पद्धतींमुळे पोल्ट्री फार्ममधील आजाराचा प्रादुर्भाव कमी होतो जेणेकरून कोंबड्यांच्या विविध विषाणूजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जैवसुरक्षा, चांगल्या व्यवस्थापन पद्धती आणि योग्य व प्रौढ अवस्थेत लसीकरणाचे वेळापत्रक पाळले पाहिजे.

- डॉ. स्वाती साखरे, ९५६१९९१२९४

(पशूवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com