Animal Feed Management : वजनानूसार गायी, म्हशीच्या खाद्याचं नियोजन

Animal Care : बहुतेक पशुपालक सरसकट सर्व जनावरांना गव्हाण भरून एकसारखा चारा देतात. पण असं करत असताना आपण चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करतोय हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही.
Animal Feed Management
Animal Feed ManagementAgrowon
Published on
Updated on

Animal Feed : बहुतेक पशुपालक सरसकट सर्व जनावरांना गव्हाण भरून एकसारखा चारा देतात. पण असं करत असताना आपण चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करतोय हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही.  येत्या काळात चारा टंचाईचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे आहे तो चारा काटकसरीने वापरण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या जनावरांच्या गरजेनूसार त्यांना मोजून चारा देण गरजेच आहे. त्यामुळे जनावरांच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चात बचत होऊ शकते. आता मोजून चारा द्यायचा म्हणजे प्रत्येक जनावराच प्रत्यक्ष वजन मोजनं तर शक्य नाहीए. त्यामुळे जनावराच वजन मोजन्याची एक सोपी ट्रीक आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला एक सुत्र वापराव लागणार आहे. 

जनावराच वजन मोजण्याची सोपी पदधत

जनावराच वजन किती आहे हे समजण्यासाठी आपल्याला जनावराच्या छातीचा घेर म्हणजे पुढील दोन्ही पायामागून मोजलेला छातीचा घेर इंचामध्ये त्याचा वर्ग, गुणिले जनावराची लांबी म्हणजे पुढील पायाच्या खुब्यापासून ते शेपटा पर्यंतचे अंतर इंचामध्ये भागिले ६६० केल्यानंतर आपल्याला जनावराचे अंदाजे वजन किलोमध्ये मिळतं.

{जनावराच्या छातीचा घेर (इंच)}२ x लांबी (इंच)/ ६६० = जनावराचे वजन (किलो) 

Animal Feed Management
Livestock Feed Management : दुधाळ गायी, म्हशींना असा आहार द्या

वजनानूसार खाद्याच नियोजन

ही झाली जनावराची वजन मोजण्याची पद्धत आता पाहुया जनावराच्या वजनानूसार त्यांना खाद्य किती द्यायच.  वजनानूसार जनावराला चारा देताना समजा जर ४०० किलो वजनाची गाय किंवा म्हैस असेल तर तिला दिवसभरात आपल्याला २७.५ किलो खाद्य द्याव लागेल. ४५० किलो वजनाच्या गायीला ३०.५ किलो खाद्य द्याव लागेल तर, ५०० किलो वजनाच्या गायीला ३३.५ किलो खाद्य द्यावे लागेल.

गाय किंवा म्हैस जर ५५० किलो वजनाची असेल तर आपल्याला तिला दिवसभरात जवळपास ३७.५ किलो खाद्य द्याव लागेल. या खाद्यामध्ये  एकूण शुष्क पदार्थ, पशुखाद्य, कोरडा आणि हिरव्या चाऱ्याच योग्य प्रमाण असायला हवं.  यामध्ये शुष्क पदार्थ म्हणजे कोरडा चारा नाही. तर चारा आणि खाद्यामधून पाणी वजा केल्यास उरणारा कोरडा पदार्थ म्हणजे शुष्क पदार्थ असतो. जर हिरवा चारा उपलब्ध नसला तर कोरडा चारा जनावराला वाढवून द्यावा. अशा प्रकारे खाद्याच नियोजन केल तर चारा वाया न जाता कमी खर्चात चाऱ्याच नियोजन करता येतं.

वजनानुसार गाई, म्हशींना खाद्य व चारा देण्याचे प्रमाण 

जनावराचे वजन - एकूण खाद्य आणि चारा 

४०० किलो - २७.५ किलो 

४५० किलो - ३०.५ किलो 

५०० किलो - ३३.५ किलो 

५५० किलो - ३७.५ किलो 

 माहिती आणि संशोधन ः पशू आहार तज्ज्ञ  डॉ. पराग घोगळे 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com