Manoj Jarange-Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : एक डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषण सुरू करा

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची लढाई खूप पिढ्यांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी टोकाची झुंज दिली. मराठा समाज राज्य आणि देशासाठी लढत राहिला.

Team Agrowon

Pune News : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका. मात्र आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्यासाठी एक डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

सकल मराठा समाज खराडी-चंदननगर, पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत सोमवारी (ता.२०) होते. जरांगे पाटील म्हणाले, की मराठा आरक्षण मिळू नये म्हणून मराठा आणि ओबीसी यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र आपण संयम ठेवा. मराठा आरक्षणाची लढाई खूप पिढ्यांपासून सुरू आहे.

अनेक वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी टोकाची झुंज दिली. मराठा समाज राज्य आणि देशासाठी लढत राहिला. मराठा माय-बापानं कधी जातीवाद केला नाही. सगळ्या जातींना आधार आणि पाठबळ देण्याचं काम माझ्या मराठा पिढ्यांनी केलं.

गोरगरिबांच्या लेकरांचे कल्याण होत असेल तर आडवं पडायचं नाही ही मराठ्यांची प्रामाणिक भावना आहे. स्वतःचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं. तरीही मराठे कधीही तुम्ही घेऊ नका असे म्हणाले नाही. आम्ही देताना कधी मागे पुढे पाहिले नाही, असेही ते म्हणाले.

मराठ्यांची पोट जात कुणबी नाही का?

जरांगे म्हणाले, की मराठ्यांचे पुरावे असताना ही नाही म्हणून सांगितले जायचे. ज्या-ज्या समित्या झाल्या त्यांनी सांगितले पुरावे सापडत नाहीत. त्यावर आजपर्यंत मराठ्यांनी विश्वास ठेवला, ७५ वर्षांनी आज २०२३ मध्ये मराठा समाजाचे पुरावे सापडायला लागले आहेत. त्यावेळी कोणते पुरावे घेतले नाहीत.

नोंदी नाहीत. कागदपत्रं नाहीत. तरीही त्यांना आरक्षण दिलं गेलं. त्यावेळी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं. मग मराठ्यांना आरक्षण का नाही. मंडल कमिशनने जी जात ओबीसी मध्ये घातली, त्याची पोटजात म्हणून आणखी एक जात घातली. मग, मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT