Maratha Reservation : मराठा आरक्षणाप्रकरणी शिंदे समिती अ‍ॅक्शन मोडवर; ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी सर्व जिल्ह्यात विशेष कक्ष

Shinde committee meeting : मराठा आंदोलनानंतर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेयांच्या समितीची सोमवारी मंत्रालयात बैठक झाली.
 cabinet
cabinetAgrowon

Manoj Jarnge News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. सोमवारी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या धर्तीवर विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

 cabinet
Chhagan Bhujbal : मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले देण्यास आमचा विरोधच ; छगन भुजबळ आक्रमक

मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्याची मागणी केली. त्याला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. ९ दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने राज्य सरकारच्यावतीने २ महिन्यांची मुदत मागितली आहे. सरकारच्यावतीने निवृत्ती न्या. शिंदे यांच्या समितीने मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील १ कोटी ७४ लाख नोंदी तपासल्या. त्यामध्ये १४ हजार ९७६ ‘कुणबी’ जातीच्या नोंदी आढळलेल्या आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदींचे स्कॅनिंग करण्याचे काम मराठवाडा विभागात झालेले आहे.

या समितीची 13 वी बैठक आज न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीस अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, डॉ. राजगोपाल देवरा अपर मुख्य सचिव (महसूल), मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधी व न्याय विभागाचे सचिव अमोघ कलोती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांच्यासह , मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना व छत्रपती संभाजीनगर येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

 cabinet
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढली

यावेळी सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कक्ष स्थापन करून त्या कक्षाला मनुष्यबळ पुरवण्यात यावे. तसेच मराठवाडा विभागाने ज्या पद्धतीने काम केले आहे त्या पद्धतीने अभिलेख शोधण्याचे काम करावे. सन 1967 पूर्वीचे अभिलेख तपासण्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com