Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्र तपासणी, वितरणासाठी विशेष कक्ष

Kunbi Record : मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात विशेष कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाला आहे.
Office
OfficeAgrowon
Published on
Updated on

Sambhajinagar News : मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात विशेष कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाला आहे. जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत ५० दाखले वितरित केले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी दिली.

विधाते म्हणाले, ‘‘जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य पुराव्याची तपासणी करण्यासाठी न्या. शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने पुराव्याची वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे आणि पात्र व्यक्तींना मराठा- कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Office
Tree Plantation : गट शेतीच्या माध्यमातून बांबू लागवड करा ; मुख्यमंत्र्यांनी केले दरे येथे बांबू रोपांची लागवड

यासाठी समितीच्या निर्देशाने विशेष कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या कक्षामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत ५० कुणबी- मराठा जात प्रमाणपत्रे वितरित केली आहेत.’’

जिल्हा कक्ष कार्यकारिणी समितीत ओमप्रकाश रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एच. चौगुले, पोलिस उप-अधिक्षक (गृह), श्री. वीर, भूमि अभिलेखच्या जिल्हा अधिक्षक, जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), संतोष झगडे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त अशोक कायंदे यांच्यासह विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Office
Drought Condition : रब्बी तर सोडाच, माणसे-जनावरेही जगवणे मुश्कील

कक्षाची कार्यपद्धती अशी...

अधिकाऱ्यांनी विशेष कक्षात उपस्थित राहून विविध विभागांशी समन्वय साधणे, अभिलेख उपलब्ध करून घेऊन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेख वेगळे करून त्याबाबत विहित नमुन्यातील अहवाल कार्यालयास व समितीस सादर करणे आदी कामे विहित कालमर्यादेत करण्यात येत आहेत.

या शिवाय न्यायालयातील जुन्या अभिलेखांमध्ये देखील कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी असे जातिवाचक उल्लेख असलेले (सन १९६७ पूर्वीचे) अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित न्यायालयाकडे विनंती करून अभिलेख उपलब्ध करून घेण्यात येत आहेत, असे विधाते यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com