Maratha Reservation : अकोल्यात आतापर्यंत आढळल्या एक लाख ३२ हजार कुणबी नोंदी

Kunbi Record : मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी प्रशासनाकडून तपासण्यात येत आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationAgrowon
Published on
Updated on

Akola News : मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी प्रशासनाकडून तपासण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख ३२ हजार १६६ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्‍चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : कुणबी नोंदीचा शोध युद्धपातळीवर

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये अभिलेख तपासणीची कार्यवाही सुरू आहे. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरेपत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंद पत्रक, कोतवाल बुक नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणीची कार्यवाही युद्धपातळीवर होत आहे.

सातही तालुक्यांमध्ये सन १९४८ ते १९६७ या कालावधीतील एकूण संख्या ५ लाख ३९ हजार ७०३ अभिलेख नोंदी तपासण्यात आल्या. त्यात कुणबी जातीच्या ७३ हजार ७७९ नोंदी आढळल्या. त्याचप्रमाणे, सन १९४८ पूर्वीच्या ४ लाख ४२ हजार ६४७ नोंदी तपासण्यात आल्या. त्यात कुणबी जातीच्या ५८ हजार ३८७ नोंदी आढळून आल्या.

Maratha Reservation
Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्र तपासणी, वितरणासाठी विशेष कक्ष

जिल्ह्यातील शैक्षणिक विभाग, पोलिस विभाग, कारागृह विभाग, जिल्हा उपनिबंधक व इतर सर्व संबंधित यंत्रणांनी अभिलेखांची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

या कार्याला गती मिळण्यासाठी व समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापण्यात आला असून, महसुली अभिलेख, शिक्षण विभाग, इतर शासकीय विभागाकडील अभिलेख वगळता कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी जातीचे अभिलेख किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी विशेष कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com