Mumbai News : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, २०१८ पासून वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी, घरभाडे भत्ता व वेतनवाढ, ५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून पुकारलेल्या संपावर तोडगा निघाला नाही. अखेर सह्याद्री अतिथिगृहात रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
विविध मागण्यांसाठी राज्यातील १३ एसटी कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. या संघटनांच्या प्रतिनिधींशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चर्चा केली. मात्र संघटना आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही.
एसटी महामंडळाने बससेवा विस्कळित झाल्याचा दावा फेटाळून लावला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, प्रतिनिधींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय देऊ असा पवित्रा घेतला.
पडळकर, खोत यांचा संपाला पाठिंबा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह संपात उतरलेल्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या भाजपच्या आमदारांनीही आपल्याच सरकारविरोधात आंदोलनात उतरण्याचा पवित्रा घेतला आहे. संपावर तोडगा न निघाल्यास उर्वरित कर्मचाऱ्यांनी संपात उतरावे, असे आवाहन दोन्ही आमदारांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.