Rabi Season: खानदेशात दादर ज्वारीचा पेरा यंदा कमी आहे. अनेकांनी हरभरा पेरण्यास पसंती दिली आहे. पुढे ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास अडचणी येतील, असे दिसत आहे. अनेक भागांत दादर ज्वारीचे पीक कमी असून, पीक सध्या बरे आहे. दादर ज्वारीची मळणी, काढणी फेब्रुवारीत सुरू होणार असून, यंदा चारा मुबलक राहणार नाही, अशी स्थिती आहे..कोरडवाहू दादर ज्वारीच्या कडब्याचे दर मागील वेळेस स्थिर होते. हा कडबा यंदा मात्र मुबलक राहणार नाही. कारण पेरा कमी आहे. खानदेशात सुमारे १४ ते १५ हजार हेक्टरवर दादर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यात कोरडवाहू, संकरित, सुधारित दादर वाणांची पेरणीही कमी झाली आहे. कडबा फक्त गिरणा, तापी, अनेर नदीच्या क्षेत्रात उपलब्ध असणार आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी दिवाळीच्या काळात काळ्या कसदार जमिनीत जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत झाली होती. या क्षेत्रात पीक मळणी फेब्रुवारीत सुरू होणार आहे..Rabi Jowar Cultivation: रब्बी पेरण्यांबाबत अनिश्चितता; ज्वारी बियाण्याच्या मिनीकिटचे वाटप होणार.या खरिपात दुष्काळी स्थितीमुळे चारा कमी उपलब्ध झाला. मागील रब्बीच्या वेळेसही ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी होती. कारण पाऊसमान २०२५ मध्ये चांगले होते. यामुळे चाराटंचाई नव्हती. पुढे दुधाळ पशुधनाला कोरडा चारा दुरापास्त होऊ शकतो. कारण साठविलेला चारा संपत आला आहे. सध्या माळरानात चारा नाही. तूर, सोयाबीनचा भुसाही कमीच असणार आहे. त्यामुळे पशुधनाला पुरेसा चारा खाऊ घालणे कठीण आहे. त्यात रब्बीत चारा पिकांची पेरणी कमी आहे. मका, संकरित ज्वारी, दादर ज्वारीचा पेरा कमी आहे. हा पेरा एकूण ३० ते ३५ टक्के कमी झाला आहे..Buldhana Rabi Sowing: बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ५६ हजार हेक्टरवर पेरण्या.थेट खरेदीखानदेशात बाजार समित्या किंवा अन्य भागांत दादर ज्वारीच्या कडब्याची आवक होत नाही. खरेदीदार थेट शिवार किंवा गावातून कडब्याची खरेदी करतात. कडबा खरेदी करून त्याची कुट्टी केली जाते. लागलीच ही कुट्टी वाहतूक करून तिचा साठा केला जातो. खानदेशात धुळ्यातील दुधाळ पशुपालक जळगाव, चोपडा व अन्य भागांतून चाऱ्याची खरेदी करतात. काही खरेदीदार बुलडाणा भागातही चाऱ्यासाठी जातात. .रावेर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागातील दुधाळ पशुपालक व अन्य शेतकरी जळगाव, चोपडा, शिरपूर भागातून दादरच्या कडब्याची खरेदी करतात. पण यंदा जिल्ह्यात चाऱ्याची अडचण राहील. यामुळे चारा वाहतूक बंदीचा फटकाही पशुपालकांना बसू शकतो, असे दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.