ST Service Stop : ऐन सणासुदीत एसटी सेवा बंद राहणार? वेतन वाढीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Kolhapur Bus Stand : आंदोलनात कर्मचारी सहभागी होणार असल्याने एसटीची सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
ST Service Stop
ST Service Stopagrowon
Published on
Updated on

ST Workers agitation : पुढच्या ४ दिवसांता गणपती सण असताना राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन द्या, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे आजपासून (ता. ३) बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

याबाबत राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकांसमोर सकाळी कर्मचारी एकत्र येत आंदोलनास सुरुवात होईल. दरम्यान, आंदोलनात कर्मचारी सहभागी होणार असल्याने एसटीची सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांबाबत बैठक आयोजित केली होती. परंतु याबाबत मिटींगच न झाल्याने राज्यभरातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. महागाई भत्त्याची २०१८ ते २०२४ दरम्यानची थकबाकी द्यावी, वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची थकबाकी द्यावी, २०१६ ते २०२० दरम्यानच्या वेतनवाढीपोटी जाहीर केलेल्या रकमेचे वाटप करावे, कर्मचाऱ्यांचे वेतन अन्य महामंडळाच्या तुलनेत कमी असून, मूळ वेतनात सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करावी, कॅशलेस योजना लागू करावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत. त्यासाठी आजपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक), कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, राज्य परिवहन यांत्रिकी कामगार संघटना, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन, रिपब्लिकन एसटी कर्मचारी संघटना, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटना, मागासवर्गीय अधिकारी व पर्यवेक्षक वेल्फेअर असोसिएशन आंदोलनात सहभागी होत आहेत.

ST Service Stop
Droupadi Murmu Kolhapur : 'अन्यथा सहकाराचा उद्देशच नष्ट होईल', राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे कोल्हापूर दौऱ्यावेळी वक्तव्य

याबाबत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख मल्लेश विभूते म्हणाले की, ‘चालक व वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या आज (ता. ३) कामाच्या वेळा निश्‍चित केल्या आहेत. एसटीच्या फेऱ्या होणार असे गृहित धरले आहे. समितीकडून धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.’

गेली कित्येक वर्षे आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहे परंतु एसटी कर्मचाऱ्यांना संघर्ष केल्याशिवाय काही हाती लागत नसल्याचे चित्र आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन आणि महागाई याचे गणित कुठेच जमत नाही. कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी हीच आहे आम्हाला राज्य शासनाकडून वेतन आणि भत्ता मिळावा. राज्य कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात अशाच एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळाव्यात ही आमची मागणी असेल जोपर्यंत यावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे मत एसटी कर्मचारी सुनिल दळवी यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com