Soybean Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Market Rate : सोयाबीन चार तर बियाणे आठ हजार रुपये क्‍विंटलवर

Market Update : शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दर ५००० रुपयांच्या वर गेले नाहीत; मात्र बियाण्यांसाठी ७५०० ते ८००० रुपये क्‍विंटल चुकवावे लागत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दर ५००० रुपयांच्या वर गेले नाहीत; मात्र बियाण्यांसाठी ७५०० ते ८००० रुपये क्‍विंटल चुकवावे लागत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. बाजारात सोयाबीन बियाण्यांची २२ आणि ३० किलोच्या बॅगमध्ये विक्री होत आहे. खाद्य तेल आयात-निर्यात धोरणात केंद्र सरकारकडून सतत बदलाचे धोरण अवलंबिण्यात आले. ग्राहकहिताला प्राधान्य देत खाद्य तेलाचे दर नियंत्रणात राहावे याकरिता केंद्र सरकारकडून तसे प्रयत्न झाले.

परिणामी, देशांतर्गत प्रक्रिया उद्योगाची सोयाबीनला यंदा अपेक्षित मागणीच राहिली नाही. त्यामुळे हंगाम संपत असताना देखील सोयाबीनचे दर तेजीत आले नाही. आताही प्रति क्‍विंटल ४००० ते ४२०० रुपये असा दर सोयाबीनला मिळत आहे. सोयाबीन बियाणे एकरी ३० किलो लागते. सध्या बाजारात विविध कंपन्यांचे वाण उपलब्ध आहेत.

यातील महाबीज तसेच काही खासगी कंपन्यांच्या वाणांना शेतकऱ्यांची मागणी राहते. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन लागवडीखालील सर्वाधीक क्षेत्र आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांत सुमारे १५.०६ लाख हेक्‍टरवर सोयाबीन लागवड राहते. या वर्षी या पाच जिल्ह्यांकरिता १ कोटी १२ लाख ५,१४३ लाख क्‍विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

...असे आहेत दर

दहा वर्षांवरील सोयाबीन वाण ८५०० रुपये क्‍विंटल. महाबीजच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ९३०५ व जेएस-३३५ या बियाण्याला शेतकऱ्यांची मागणी राहते. या दोन्ही वाणांची ३० किलोची बॅग २५५० रुपयांना उपलब्ध आहे. १० वर्षांच्या आतील वाणांमध्ये पीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया, जेएस- २०११६ या वाणांचा समावेश असून, याची बॅग २२ किलोमध्ये उपलब्ध आहे. १९१५ रुपये (८७ रुपये किलो) असा बॅगचा दर आहे. जेस- २०३४ (एनआरसी १३०), एमएसीएल-१४६० हे बियाणे देखील २२ किलोच बॅगमध्ये असून १९१४ रुपये असा दर आहे.

शेतकऱ्यांचे सोयाबीन चार हजारांवर असताना बियाणे मात्र दुप्पट दरात विकले जात आहे. कंपन्यांकडून त्यावर होणारी प्रक्रिया, मजुरी व त्यांचा नफा अपेक्षित धरता हे दर जास्त आहेत. परंतु बियाणे उद्योगावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने लुटीचा हा व्यवहार अव्याहतपणे सुरू आहे. ग्राहक हित नजरेसमोर ठेवत शासनाकडून दर नियंत्रणाचे काम होत असून त्यात शेतकऱ्यांची नाहक परवडत होत आहे.
मनीष जाधव, प्रयोगशील शेतकरी, वागद, जि. यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द : महसूलमंत्री बावनकुळे

Agricultural Tools Scam: घोटाळेबहाद्दरांचे कारनामे

Forest Land Leasing: वनक्षेत्राजवळील जमीन भाडेपट्ट्याने

Vidarbha Heavy Rain : विदर्भात २५८ मंडलांत अतिवृष्टी; उर्वरित राज्यात जोर कमी

Sewage Treatment Project: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जी

SCROLL FOR NEXT