Cotton Soybean Market : कापूस, मूग, सोयाबीनमध्ये उतरता कल

Agriculture Commodity Market : मे महिन्यात कापूस, मूग, सोयाबीन यांच्या किमतींत उतरता कल होता. इतर सर्व पिकांच्या किमती वाढत होत्या.
Soybean Cotton Market
Soybean Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती ः सप्ताह १ ते ७ जून २०२४

१ जूनपासून NCDEX मध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू झाले. या एक्स्चेंजमध्ये सध्या मक्याचे जून व जुलै डिलिव्हरीसाठी तर हळदीचे जून, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार करता येतील. MCX मध्ये कापसाचे जुलै व सप्टेंबर डिलिव्हरीसाठी तर कपाशीचे नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू आहेत. १४ जूनपासून कापसाचे नोव्हेंबर व जानेवारी डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू होतील.

या नवीन व्यवहारांमध्ये काही स्वागतार्ह बदल केले आहेत. ट्रेडिंग व डिलिव्हरी युनिट आता कमी केले आहेत (४८ खंडी म्हणजे १०० गाठींवरून १२ खंडी म्हणजे २५ गाठी). महाराष्ट्रासाठी डिलिव्हरी केंद्रे वाढवली आहेत (जळगाव, जालना, नांदेड व यवतमाळ). टिक साइजसुद्धा २० रुपयांवरून १० रुपयांवर आणला आहे. या सर्व बदलांचा फायदा घेऊन शेतकरी व त्यांच्या संस्थांनी वाढत्या प्रमाणात फ्यूचर्स व्यवहारात सहभागी व्हावे, हा प्रमुख उद्देश आहे.

मे महिन्यात कापूस, मूग, सोयाबीन यांच्या किमतींत उतरता कल होता. इतर सर्व पिकांच्या किमती वाढत होत्या. ७ जून रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात १.२ टक्क्याने घसरून रु. ५६,६६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.८ टक्क्याने घसरून रु. ५६,२०० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव १.३ टक्क्याने घसरून रु. ५६,८४० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव रु. ५९,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.३ टक्क्याने घसरून रु. १,४४३ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

Soybean Cotton Market
Cotton Cultivation : कापसाचे क्षेत्र पाच टक्क्यांनी घटणार

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात रु. २,२२० वर स्थिर आहेत. फ्यूचर्स (जुलै) किमती ०.७ टक्क्याने वाढून रु. २,२२९ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,२३९ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत. पुढील महिन्यांसाठी व्यवहार अजून सुरू झाले नाहीत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १८,०३८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.३ टक्क्याने वाढून रु. १८,०९७ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १७,९१४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १८,५७२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.६ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ६,९०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.४ टक्क्याने घसरून रु. ६,८०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) ०.९ टक्क्याने वाढून रु. ८,३३८ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. मुगाची आवक आता सुरू झाली आहे. साधारणतः जूनअखेर ती उच्चांक गाठते. सध्या गुजरातमध्ये आवक वाढती आहे. एकूण देशातील आवकेमध्ये तिचा ५० टक्के वाटा आहे. वाढत्या आवकेमुळे मुगाच्या किमती एप्रिलपासून उतरत आहेत. आता त्या हमीभावापेक्षा कमी झाल्या आहेत.

Soybean Cotton Market
Soybean MSP : सोयाबीनच्या हमीभावात पाच, तुरीत दहा टक्के वाढ शक्य

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.५ टक्का वाढून रु. ४,६८४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,७०९ वर आली होती. या सप्ताहात ती ५.९ टक्क्यांनी वाढून रु. ११,३४१ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,९८८ होती; या सप्ताहात ती रु. २,१९६ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,२०० वर आली होती. या सप्ताहात रु. २,४५० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com