Cotton Seed Sales : जादा दराने कपाशी बियाणे विक्रीविरुद्ध ‘कृषी’ची धडक मोहीम

Agriculture Department : कृषी विभागाच्या धडक मोहीममध्ये शनिवारी (ता. ८) डमी ग्राहक पाठवून जादा मागणी असणाऱ्या कपाशीच्या बियाण्यांची चढ्या भावाने विक्री करताना पाच दुकानदार आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली.
Agriculture Seed Shop
Agriculture Seed ShopAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : कृषी विभागाच्या धडक मोहीममध्ये शनिवारी (ता. ८) डमी ग्राहक पाठवून जादा मागणी असणाऱ्या कपाशीच्या बियाण्यांची चढ्या भावाने विक्री करताना पाच दुकानदार आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली.

Agriculture Seed Shop
Cotton Seeds : बाजारात कपाशीचे ‘ते’ बियाणे मिळेना

कृषी विभागाचे भरारी पथकाने (राज्य व जिल्हा परिषद ) शनिवारी सिल्लोड तालुक्यामध्ये जादा दराने कपाशीचे बियाणे विक्री करणाऱ्या तसेच जास्त मागणी असणाऱ्या वाणांची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना विक्री न करणाऱ्या कृषी सेवा केंद्राविरुद्ध धडक मोहीम राबविली. या मोहिमेत सिल्लोड येथील कांचन अग्रो एजन्सीमध्ये कबड्डी वणाचे ४७५ ग्रॅमचे एक पाकीट ८६४ रुपये मूळ किंमत असताना विक्रेत्याने बाराशे रुपयांना फोन पेद्वारे विकले असल्याचे आढळले.

शिवना येथील माऊली कृषी सेवा केंद्रमध्ये राशी कंपनीचे ६५९ हे वाण विक्रेत्याने ११०० रुपयांना फोन पेद्वारे विकले त्याची मूळ किंमत ८६४ रुपये होती. बळीराजा ॲग्रो एजन्सी शिवना विक्रेत्याने टीएरा कंपनीचे ब्रह्मा वाण १००० रुपयांना फोन पेद्वारे विकले त्याची मूळ किंमत ८६४ रुपये इतकी आहे.

Agriculture Seed Shop
Cotton Seed : पावणे दहा लाख कपाशी बियाणे पाकिटांची उपलब्धता

श्रद्धा कृषी सेवा केंद्र शिवना या विक्रेत्याने तुलसी कंपनीचे कबड्डी वाण १२०० रुपयांना फोन पेद्वारे विकले त्याची मूळ किंमत ८६४ रुपये आहे. साईनाथ कृषी सेवा केंद्र शिवना या विक्रेत्याने तुलसी कंपनीचे कबड्डी वाणाचा स्टॉक असतानाही मुद्दाम शेतकऱ्यांना दिला नसल्याचे आढळले. या कृषी सेवा केंद्राची तपासणी करून कारवाईचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख व कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी आर. ए. पाटील व पंचायत समिती कृषी अधिकारी संजय व्यास तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांनी केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com