डॉ. मनोहर इंगोले, डॉ. अर्चना थोरात, डॉ. गीतांजली कांबळेChana Farming: रब्बी हंगामातील हरभरा पिकाची १०० ते ११० दिवसांत हेक्टरी २० ते २४ क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता आहे. मात्र, या पिकावर येणाऱ्या मर, खोडकूज, मूळकूज अशा रोगांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळताना दिसत नाही. त्यातच या वर्षी भरपूर पाऊस झाला असून, जमिनीमध्ये ओलावाही अधिक आहे. .अशा स्थितीमध्ये हरभरा पिकावर मर आणि खोडकूज या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दिसते. मर रोग हा रोगग्रस्त बियाणे आणि जमिनीतून पसरतो. खोडकूज रोग व मूळकूज यांचाही प्रादुर्भाव जमिनीतून होतो. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या काळात हरभरा पिकाच्या संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे..Chana Characteristics: हरभरा वाणांची गुणवैशिष्ट्ये.मर रोगहा रोग फ्युजॅरिअम सायसेरी या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे उत्पादनात १० ते १०० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.लक्षणेहा रोग पिकाच्या वाढीच्या सर्वच अवस्थेमध्ये आढळून येतो.या बुरशीचा रोपात प्रवेश झाल्यानंतर हळूहळू ही बुरशी झाडात वाढते. नंतर पाने पिवळसर पडतात..पाने पिवळे पडून कोमजतात, शेंडे मलूल होतात.अशी झाडे उपटून पाहिल्यास जमिनीच्या संपर्कात येत असलेला व त्या वरील खोडाचा थोडासा भाग बारीक झालेला आढळतो.फुलोऱ्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडे एकाएकी मृत पावण्यास सुरुवात होते. शेताच्या एका विशिष्ट भागामध्ये असे बरीच झाडे मलूल झालेली आढळतात.झाडाच्या मुळापासून उभा काप घेतल्यास त्या ठिकाणी काळ्या रंगाची उभी रेघ आढळून येते..खोडकूज रोगया रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेत (६ आठवड्यापर्यंत) जास्त आढळतो. हा रोग स्क्लेरोशिअम रोलफसाय या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे हरभरा पिकाचे सुमारे १२ ते १५ टक्के नुकसान होते..Chana Cultivation : दसरा सणाला हरभरा पेरणीची अडचण.लक्षणेया रोगाचा सर्वप्रथम झाडाची पाने पिवळी पडतात, नंतर संपूर्ण झाड पिवळे पडतात.रोगग्रस्त झाडे उपटल्यास जमिनीलगतच्या खोडावर व सोट मुळांवर पांढरी बुरशी आढळते. या रोगामध्ये झाडे मोठ्या प्रमाणात वाळतात. पेरणीच्या वेळी जमिनीत जास्त ओलावा व तापमान असल्यास, अशा जमिनीत रोगाचा प्रादुर्भाव होतो.खरिपामध्ये सोयाबीन किंवा अन्य पिके घेतलेल्या शेतात काडीकचरा, पालापाचोळा व धसकटे न वेचता हरभरा पीक घेतल्यास खोडकूज रोगाची बुरशी न कुजलेल्या पालापाचोळ्यावर झपाट्याने वाढते. रोगाचा प्रसार लवकर होतो..सर्व साधारणतः या रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेत म्हणजे पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांपर्यंत दिसून येतो.खोडकूज रोगामुळे रोपे पिवळी पडून वाळतात. रोपाचा जमिनीलगतचा भाग बारीक होऊन कुजू लागतो.प्रादूर्भाव झालेल्या खोड व मुळाच्या भागावर पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते. तसेच बारीक मोहरीच्या आकाराचे बुरशीचे गोल स्क्लेरोशिया दिसतात. अशी रोगग्रस्त झाडे पिवळी पडून वाळतात..व्यवस्थापनमागील वर्षी रोग असलेल्या शेतात तसेच पाणी साचणाऱ्या शेतात हरभऱ्याचे पीक घेणे टाळावे. आधीच्या पिकाचे रोगग्रस्त अवशेष जाळून नष्ट करावेत.एकाच शेतात हरभऱ्याचे पीक सतत घेणे टाळावे. पिकांची फेरपालट करावी.रोग प्रतिकारक वाण सुपर जाकी (AKG-१४०२), पिडीकेव्ही काबुली ५ (AKGK-१८०१), जाकी ९२१८, पिकेव्ही काबुली २, पिकेव्ही काबुली ४, पिडीकेव्ही कांचन, पिडीकेव्ही कनक यांचा वापर करावा..पेरणीपूर्वी हरभरा बियाण्यास टेब्युकोनॅझोल (५.४ टक्के डब्ल्यू.डब्ल्यू .एफ.एस.) या बुरशीनाशकाची ४ मि.लि. किंवा प्रोक्लोरॅझ (५.७ टक्के) अधिक टेब्युकोनॅझोल (१.४ टक्के डब्ल्यू/ डब्ल्यू इ.एस.) (संयुक्त बुरशीनाशक) ३ मि.लि. प्रती १० किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.त्यानंतर पेरणीच्या थोडे आधी ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.- डॉ. मनोहर इंगोले ९४२१७५४८७८(कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.