Soybean Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed : सोयाबीन बियाणे रब्बीतही बाजारात मिळणार

Rabi Season : खानदेशात रब्बीतही सोयाबीनची पेरणी वाढेल, अशी स्थिती आहे. त्यासाठी अनेक कंपन्या बियाणे पुरवठ्याचे नियोजन करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बीतही सोयाबीनची पेरणी वाढेल, अशी स्थिती आहे. त्यासाठी अनेक कंपन्या बियाणे पुरवठ्याचे नियोजन करीत आहेत. जिल्ह्यात यंदा सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर रब्बीत सोयाबीन पेरणी होऊ शकते. त्यासाठी बियाणे लागणार आहे. परंतु बियाणे उगवण व अन्य समस्या लक्षात घेऊन काही कृषी केंद्रचालक बियाणे विक्रीबाबत सावध भूमिका घेत आहेत. असाच प्रकार खरिपातही झाला होता.

परंतु दुसरीकडे हे बियाणे विक्रीसंबंधी अनेक कृषी केंद्रचालक उगवणीच्या तक्रारी व कारवाईची कटकट लक्षात घेता नकार देत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे २००० कृषी केंद्रे आहेत. तर धुळे व नंदुरबारमध्ये मिळून सुमारे ७०० कृषी केंद्रे आहेत. तालुका किंवा शहरातील कृषी केंद्रचालक सोयाबीन बियाण्यांची अधिक विक्री करतात. ग्रामीण भागात हे बियाणे फारसे उपलब्ध होत नाही.

परंतु गेले काही वर्षे बियाणे उगवणीच्या तक्रारी आणि पुढे न्यायालायीन बाबींना सामोरे जाण्याची वेळ आल्याने यंदा अनेक कृषी केंद्रचालक सोयाबीन बियाणे विक्रीसंबंधी नकार देत आहेत. कारण बियाणेनिर्मिती कंपन्या करतात. कृषी केंद्रातून फक्त त्याची विक्री होते. परंतु शेतकरी तक्रारीसाठी कृषी केंद्रात येतात, कृषी विभागाचे अधिकारीदेखील कृषी केंद्राकडे येतात.

नोटिसा, खुलासे यात कृषी केंद्रचालकांनाच मनःस्ताप सहन करावा लागतो. भरपाईचे दावे, पंचनामे यातही सहभाग घ्यावा लागतो. यात वेळ वाया जातो. सोयाबीनच्या १५० ते १६० पिशव्या (एक पिशवी ३० किलो क्षमता) विक्रीतून साडेसात ते आठ हजार रुपये नफा मिळतो.

एवढ्या नफ्यासाठी पुढे आपला वेळ वाया घालविणे आणि तक्रारींचा सामना करणे परवडणारे नाही, असा मुद्दाही काही कृषी केंद्रचालक उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे कृषी विभाग बियाणे विक्रीची सक्ती कृषी केंद्रांना करू शकत नाही. सध्या कुठलीही टंचाई नाही, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT