Parbhani News : यंदाच्या (२०२३) ऑक्टोंबर अखेरपर्यंत रब्बी पिकांच्या ११ हजार ९३५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला असून ७ हजार ६९ क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे. यंदा जमिनीत ओलावा नसल्यामुळे रब्बी पिकांच्या बियाण्यांना कमी मागणी आहे. ६ हजार१९० क्विंटल बियाणे शिल्लक होते, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
यंदाच्या रब्बी हंगामातील प्रस्तावित २ लाख ८७ हजार २०० हेक्टर क्षेत्रानुसार कृषी विभागाने ५७ हजार ३६३ क्विंटल बियाण्याची मागणी केली होती. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे २९ हजार ७१८ क्विंटल व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडे २७ हजार ६४५ क्विंटल बियाण्याची मागणी केली होती.
सार्वजनिक बियाणे उत्पादकांनी १० हजार २९८ क्विंटल व खाजगी कंपन्यांनी १ हजार ६१७ क्विंटल बियाण्याचा मिळून एकूण ११ हजार ९३५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. ऑक्टोंबर अखेर पर्यंत ७ हजार ६९ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.
त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांचे ६ हजार ७६५ क्विंटल व खाजगी कंपन्यांचे ३०९ क्विंटल बियाणे आहे. ज्वारीच्या १ हजार १६२ क्विंटल, गव्हाचे १२० क्विंटल, हरभऱ्याचे ५ हजार ६५२ क्विंटल, करडईचे १३५ क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे. ज्वारीचे ६३८ क्विंटल, गव्हाचे ६९० क्विंटल, हरभऱ्याचे ४ हजार ८१० क्विंटल, करडईचे ५० क्विंटल बियाणे शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.