Rabi Seed
Rabi SeedAgrowon

Rabi Seed : हिंगोली जिल्ह्यात रब्बीच्या ३९ हजार ९०८ क्विंटल बियाण्याची विक्री

Rabi Season : रब्बी हंगामात विविध पिकांच्या ४६ हजार १११ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. शुक्रवार (ता. १५)पर्यंत ३९ हजार ९०८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली असून, ६ हजार २०३ क्विंटल बियाणे शिल्लक होते.
Published on

Hingoli News : जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात विविध पिकांच्या ४६ हजार १११ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. शुक्रवार (ता. १५)पर्यंत ३९ हजार ९०८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली असून, ६ हजार २०३ क्विंटल बियाणे शिल्लक होते.

जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८२ हजार १५० हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात १ लाख ८० हजार हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित होते. त्यानुसार कृषी विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडून ७ हजार ८६० क्विंटल व खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून ४९ हजार ८०९ क्विंटल असे मिळून एकूण ५७ हजार ६६९ क्विंटल बियाण्याची मागणी केली होती. सार्वजनिक क्षेत्रातून ८ हजार ४१२ क्विंटल व खासगी कंपन्यांकडून ३७ हजार ६९९ क्विंटल असे एकूण ४६ हजार १११ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला.

Rabi Seed
Rabi Seed : रब्बीच्या ७ हजार क्विंटल बियाण्याची विक्री

ओलाव्या अभावी प्रस्तावित क्षेत्रापैकी हजारो हेक्टर जिरायती क्षेत्र नापेर राहिले होते. त्यामुळे बियाणेसाठा शिल्लक होता. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी राहिलेलील पेरणी केली.

Rabi Seed
Seed For Rabi Season : रब्बीसाठी ७५ हजार १३९ क्विंटल बियाण्यांची गरज

मर रोगामुळे सुरुवातीला पेरणी केलेला हरभरा मोडून टाकल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे बियाण्याची विक्री झाली. शुक्रवार (ता. १५)पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांचे ६ हजार ७६१ क्विंटल व खासगी कंपन्यांचे ३३ हजार १४७ क्विंटल, असे एकूण ३९ हजार ९०८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.

त्यात ज्वारीचे ३३६ क्विंटल, गव्हाच्या १० हजार ६६७ क्विंटल, हरभऱ्याच्या २२ हजार ६०५ क्विंटल, मक्याच्या १०० क्विंटल, करडईच्या २०२ क्विंटल, सूर्यफुलाच्या ३६ क्विंटल, इतर ९ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. शिल्लक बियाण्यात ज्वारीचे २०६ क्विंटल, गव्हाचे ३ हजार १०९ क्विंटल, हरभऱ्याचे २ हजार ४९ क्विंटल, मक्याचे १२ क्विंटल, करडईच्या २० क्विंटल, सूर्यफुलाच्या ४ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com