Millipede Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Millipede Pest : पैसा-वाणी किडीचे वेळीच नियंत्रण करा

Soybean pest : पैसा-वाणी ही एक निशाचर कीड असून सामान्यतः सडणारी पाने, तसेच काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती इत्यादी पदार्थांना खाऊन उपजीविका करते.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील सोयाबीन आणि इतर खरीप पिकांवर पैसा वाणी अ-कीटक वर्गीय किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रवीण देशपांडे व वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. ए. एस. झापे यांनी केले आहे.

पैसा-वाणी ही एक निशाचर कीड असून सामान्यतः सडणारी पाने, तसेच काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती इत्यादी पदार्थांना खाऊन उपजीविका करते. जेव्हा यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणाऱ्या रोपावस्थेतील पिकांना खाऊन नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कुरतडून टाकतात.

कालांतराने रोपांवर जाऊन पानेसुद्धा कुरतडतात. यामुळे रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची सुद्धावेळ येऊ शकते. या किडीच्या वाढीसाठी जमिनीत आर्द्रता असणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्यात किंवा जिथे ओलीताची सोय अशा ठिकाणी ही कीड जास्त सक्रिय असते.

नियंत्रणासाठी उपयायोजना

कृषी विज्ञान केंद्राने दिलेल्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी शेतातील पालापाचोळा व कुजलेला कचरा गोळा करून नष्ट करावा. रात्री गवताचे ढिग ठेवून सकाळी त्याखाली जमा झालेली वाणी साबण किंवा मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट करावी. बांधावरील गवत, दगड हटवून बांध मोकळा ठेवावा व शेतातील आर्द्रता कमी ठेवावी.

वेळोवेळी कोळपणी करून जमिनीत लपलेल्या किडी व अंडी उघड्यावर आणावीत. पीक उगवल्यानंतर पैसा वाणीचा प्रादुर्भाव दिसल्यास क्लोरपायरीफॉस (२० टक्के) ३७.५ मिली प्रति १० लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी. पंपाचे नोझल ढिले करून रोपांभोवती वर्तुळाकार किंवा सरळ ओळीत आळवणी करावी. एक एकर क्षेत्रात ४० पंपाचे ड्रेंचिंग करावे, अशी अॅग्रस्को शिफारस आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Agri Budget: अर्थसंकल्पात कृषी यांत्रिकीकरणाला बगल

Summer Vegetables: उन्हाळ्याची चाहूल, कोल्हापुरी शेतीमालाला मागणी

River Linking Project: दुष्काळी भागातील सिंचनासाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य

Watermelon Market: कलिंगड खरेदीत शेतकऱ्यांची लूट

Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी

SCROLL FOR NEXT