Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ खरीप हंगामासाठी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२७ कोटी ५० लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून, एकूण ८९ हजार ६२९ शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल. .जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्याने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी विशेष बैठक घेतली होती. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले..Cashew Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा.याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यासाठी एकूण ६२८ कोटी ८० लाख रुपये ५१ हजार ५३९ रुपये इतकी भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील चार लाख ७६ हजार ३९२ शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. या मदतीपैकी ३३० कोटी ५४ लाख ८३ हजार ९२५ रुपये इतकी मदत यापूर्वीच जिल्ह्यातील दोन लाख २८ हजार ६३६ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. .सप्टेंबर २०२५ मध्ये वाटप होणारी नुकसान भरपाई १२७ कोटी ५० लाख २३ हजार ६८० रुपये मंजूर झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८९ हजार ६२९ शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. नुकसान भरपाईची रक्कम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. .Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीतील ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा.याशिवाय राज्य शासनाकडे जिल्ह्यातील प्रलंबित दाव्या संदर्भातही कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असून ही प्रकरणेही मंजूर झाल्यानंतर नुकसानीच्या रकमेत वाढ होणार आहे. त्याचा फायदा बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल. पीकविम्यासंदर्भात तालुकास्तरीय पीकविमा कार्यालयाशी संपर्क साधावा कसे आवाहन जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे.....अशी मिळणार तालुकावार पीकविम्याची मदतचिखली २५,११० शेतकरी - ३७ कोटी १७ लाख ५९८५६मेहकर २०,५८१ शेतकरी - २५ कोटी ८८ लाखसिंदखेड राजा ९,५१० शेतकरी- १७ कोटी ३४ लाखखामगाव ३,९४२ शेतकरी- १० कोटी २१ लाखनांदुरा ९,७०८ शेतकरी- ८ कोटी ७७ लाखलोणार ९,४१८ शेतकरी - ७ कोटी २४ लाखबुलडाणा ३,६६८ शेतकरी - ६ कोटी ६५ लाखमोताळा २,४९१ शेतकरी - ४ कोटी ७ हजारदेऊळगाव राजा २,५२० शेतकरी - २ कोटी ८५ लाखजळगाव जामोद १,०८८ शेतकरी - २ कोटी ५५ लाखशेगाव ७५६ शेतकरी - २ कोटी २७ लाखसंग्रामपूर ६१२ शेतकरी - १ कोटी ९२ लाखमलकापूर २२५ शेतकरी - ५९ लाख.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.