Sangli News : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने कृष्णा आणि वारणा नदीला पूर आला. या दोन्ही संकटामुळे ६ हजार ४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामे सुरु केले आहे. सद्यस्थितीला १३३० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली..जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सलग पाच ते सहा दिवस अतिवृष्टी झाली. त्यातच कृष्णा आणि वारणा काठी पूरही आला. त्यामुळे मिरज, पलूस, शिराळा आणि वाळवा या तालुक्यातील १२९ गावातील १३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे ६०४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून संबंधित विभागाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात ६० टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण.गेल्या दोन दिवसापूर्वी १११ गावातील ११ हजार ७५७ शेतकऱ्यांचे ४७९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा नजर अंदाजे अहवाल कृषी विभागाने तयार केला होता. या चारही तालुक्यातील बाधित पिकांचे संबंधित विभागाने पंचनामे सुरु केले आहेत. .प्रत्यक्ष पंचनामे करण्यासाठी पोहोचल्यानंतर अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि गावांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शुक्रवार (ता. २९) अखेर १२९ गावातील १३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे ६०४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे..Crop Damage Survey : बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा.अर्थात दोन दिवसात बाधित गावांची संख्या १८ ने वाढली आहे. तर २०७० शेतकऱ्यांची संख्या वाढून १२५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान वाढले आहे. बाधित झालेल्या प्रत्येक गावात पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या चार तालुक्यातील ७६ गावातील ९०१० शेतकऱ्यांचे ४९८४ हेक्टरवरील बाधित पिकांचे गतीने पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे लवकर पंचनामे पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे..तालुकानिहाय झालेले पंचनामेदृष्टीक्षेप (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका शेतकरीसंख्या गावांची संख्याक्षेत्रमिरज ३३२ ४० १९४.३७वाळवा १९०८ २१ ३७६.०६शिराळा ७४५ १३ १५७पलूस २२६२ ३ ६०३.३१एकूण ५२४७ ७७ ११३०.७४.ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचनामे गतीने सुरु आहेत. पंचनामे पूर्ण झाले की, त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार आहे.विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.