Kolhapur News : भुदरगड तालुक्यात यंदा ऊस पीक बदलत्या हवामानामुळे अडचणीत आले आहे. नदीकाठचे ऊस पिके अडचणीत असून, यंदा ऊस उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटीचा फटका शेतकरी वर्गाला बसणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे..यंदा अवकाळी पाऊस, वळीव, मॉन्सूनपूर्व पाऊस आणि मॉन्सून तसेच पूर आल्याने जिल्ह्यात गेले सलग तीन महिने पावसाळी वातावरण राहिले. परिणामी खरिपाच्या पेरण्या काही ठिकाणी अपूर्ण राहिल्या. शेतात पाणी साचून राहिल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटली. भुदरगड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे ऊस पीकही सततच्या पावसामुळे बाधित झाले आहे. त्यामुळे ऊसासह साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे..Sugarcane Fertilizer Management : उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर.सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे गणित बिघडले आहे. शेतशिवारात पाणी साचल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. अनेक पिकांची वाढ खुंटली आहे. मशागतीच्या काळात मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वापसा स्थिती (घात) निर्माण झालेली नाही. खरीप पिकांच्या पेरणीसाठी मशागतीची कामे अपूर्ण राहिली. धूळवाफ पेरणी शंभर टक्के झाली नाही. रोप लागवडीमध्येही अडचणी आल्या. पावसाने उघडीप न दिल्याने नाचणीची पेरणी कमी झाली. डोंगरमाथ्यावरचा पेरा होऊ शकला नाही.\.जिल्ह्यात ऊस हेच मुख्य पीक झाले आहे. उसाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८६ हजार २१५ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ९६ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र, यंदाच्या अतिपावसामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांत पावसाने थोडी उघडीप देणे आवश्यक आहे; अन्यथा उसाचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे..Sugarcane Nutrient Management : उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन .प्रकाशसंश्लेषण व पिकांची वाढकोणत्याही पिकाच्या वाढीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश, वाफसा आणि उबदार हवामान आवश्यक असते. पानामधील हरितद्रव्य सूर्यप्रकाशात हवेतला कर्बवायू व जमिनीतून मिळणारी अन्नद्रव्ये शोषून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून स्वतःचे अन्न तयार करते. यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. ढगाळ वातावरणात ही प्रक्रिया मंदावते व वाढ खुंटते..जिल्ह्यातील ऊस पिकाची स्थितीसर्वसाधारण क्षेत्र : १ लाख ८६ हजार २१५ हेक्टरप्रत्यक्ष लावण : १ लाख ९६ हजार ३४१ हेक्टरआडसाली लावण : २६ हजार ३७८ हेक्टरपूर्वहंगामी लागवड : ४१ हजार ४३६ हेक्टरसुरू उसाची लावण : ४२ हजार ७३५ हेक्टरखोडवा ऊस : ८५ हजार ७९२ हेक्टर.ऊस लागणीनंतर १२० ते २७० दिवसांच्या कालावधीत उबदार हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, जमिनीत पुरेसा ओलावा, तापमान २० ते ३२ डिग्री सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ८० टक्के असल्यास कांड्यांची संख्या, लांबी, जाडी तसेच पानांची वाढ जोमाने होते. मात्र, सतत पाऊस व जमिनीत साचलेले पाणी असल्यास पोषण होत नाही आणि वाढ खुंटते वा अपुरी राहते, परिणामी उत्पादन घटते.- डॉ. अशोकराव पिसाळ, सहयोगी अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.