Solar Project Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Energy : सौर ऊर्जानिर्मिती फायदेशीर

Solar Power Generation : नगर जिल्ह्याची २२०८ मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीची क्षमता असून, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील ऊर्जा निर्मिती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्याची २२०८ मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीची क्षमता असून, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील ऊर्जा निर्मिती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

जिल्ह्यात २१० मेगावॉट सौर वीज निर्मितीची निविदा प्रसिद्ध झाली असून, आणखी १८८ मेगावॉट सौर वीजनिर्मितीच्या निविदेची तयारी पूर्ण झाली आहे, असे महावितरण होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्‍वास पाठक यांनी सांगितले.

महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांची जिल्हा आढावा बैठक शिर्डी येथे झाली. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, महापारेषणचे संचालक संदीप कलंत्री, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता मुरहरी केळे आणि महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे उपस्थित होते.

विश्‍वास पाठक म्हणाले, की शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमितपणे दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ला चालना दिली आहे. यामध्ये सौरऊर्जेचा वापर करून सात हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

त्यापैकी साडेतीन हजार मेगावॉट वीजनिर्मितीची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील २१० मेगावॉट वीजनिर्मितीचा समावेश आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांसोबत अनेक उद्योजकांसह अनेक घटकांना लाभ होणार असून, राज्यासाठी ही गेमचेंजर योजना आहे. वाढती वीज मागणी ध्यानात घेऊन दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आरडीएसएस ही योजना राबविण्यात येत आहे.

त्यामध्ये नगर जिल्ह्यात २१६२ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये नवीन वीज उपकेंद्रे उभारणे, नवे ट्रान्स्फॉर्मर बसविणे, स्मार्ट मीटर बसविणे, वीज जाळे मजबूत करणे अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे आगामी १८ महिन्यांत पूर्ण करायची आहेत. महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी कंपनीच्या जिल्ह्यातील कामगिरीचे सादरीकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT