Solar Power Generation : सांगली, कोल्हापुरातील वीजनिर्मिती क्षमतेचा १०० मेगावॉटचा टप्पा पूर्ण

Electricity : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांनी सौरछताद्वारे वीजनिर्मिती क्षमतेचा १०० मेगावॉटचा टप्पा ओलांडत आघाडी घेतली असून ६ हजार ६२६ सौर ग्राहकांचा सहभाग आहे.
SPV power generation
SPV power generationAgrowon

Sangli News : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांनी सौरछताद्वारे वीजनिर्मिती क्षमतेचा १०० मेगावॉटचा टप्पा ओलांडत आघाडी घेतली असून ६ हजार ६२६ सौर ग्राहकांचा सहभाग आहे. यात सांगलीतील २ हजार ३१८ ग्राहकांनी ३४.२७ मेगावॉट क्षमतेची व कोल्हापुरातील ४ हजार ३०८ ग्राहकांनी ६५.७९ मेगावॉट क्षमतेची सौर यंत्रणा वीजनिर्मितीसाठी आपल्या छतावर बसविली आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांची सरासरी विजेची मागणी ९२७ मेगावॉट आहे. ग्राहकांकडून ‘सौर’चा हा १०० मेगावॉटचा टप्पा आशादायक वाटचाल आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे घरगुती ग्राहकांना (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) सौरछत, ‘रूफ टॉप सोलर’ बसविण्यासाठी अनुदानाची सुविधा उपलब्ध आहे. या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेची महावितरणकडून अंमलबजावणी सुरू आहे. वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले आहे.

SPV power generation
Solar Scheme : ‘सौर कृषी वाहिनी’चा कर्नाटक करतेय अभ्यास

अधिक माहिती व अर्जाची सुविधा महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार ५७ व सांगलीतील ४५२ घरगुती ग्राहकांनी अनुदान योजनेचा लाभ घेऊन सौर यंत्रणा बसविली आहे. उर्वरित ग्राहकांनी विनाअनुदानित तत्त्वावर सौर यंत्रणा बसविली आहे.

SPV power generation
Solar Energy : सौरऊर्जेतून ५०१ मेगावॅटवर वीजनिर्मिती

त्यात कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती १९१४, वाणिज्य ८०२, औद्योगिक ३२३ व अन्य २१२, तर सांगली जिल्ह्यात घरगुती ९९०, वाणिज्य ४०५, औद्योगिक १५८ व अन्य ३१३ ग्राहकांनी विनाअनुदानित तत्त्वावर सौर यंत्रणा बसविली आहे.

एक किलोवॉट क्षमतेच्या सोलर रूफ टॉप यंत्रणेसाठी साधारणपणे १०८ चौरस फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा आवश्यक आहे. त्याद्वारे वार्षिक सरासरीनुसार प्रत्येक महिन्याला १२० युनिट वीजनिर्मिती होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com