Sangli News : पश्चिम महाराष्ट्रात छतावरील सौरऊर्जा निर्मिती योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २४ हजार ३८७ प्रकल्प कार्यान्वित झाल्या असून यामधून वीजनिर्मितीची ५०१ मेगावॅट क्षमता निर्माण झाली आहे.
यामध्ये अनुदान मिळालेल्या ३ हजार ८८५ घरगुती व सोसायट्यांनी १७ मेगावॅटचे तर बिगर अनुदानामध्ये २९ हजार ५०२ घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांनी ४८४ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत, अशी माहिती महावितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.
केंद्र शासनाने २०२२ ते जानेवारी २०२४ पर्यंत छतावरील सौरऊर्जा निर्मितीसाठी घरगुती ग्राहकांसाठी राज्याला १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले आहे.
छतावरील सौरऊर्जा निर्मिती योजनेमध्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जात आहे. त्यामुळे या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या दीड वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील ३ हजार ८८५ घरगुती ग्राहकांनी छतावर तब्बल १७.०४ मेगावॅट (१७ हजार ४७ किलोवॅट) क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत. घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
सद्यःस्थितीत या पाचही जिल्ह्यांमध्ये १४४ ठिकाणी १.९ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून १९४१ ठिकाणी ३१.४ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यतेची तपासणी सुरू आहे.
जिल्ह्यानुसार छतावर सौर
पॅनेल्सद्वारे वीजनिर्मिती वर्गवारी
जिल्हा ग्राहकांची
संख्या वीजनिर्मिती (मेगावॅटमध्ये)
पुणे १२ हजार ८७६ ३१६.२
सातारा १९४४ ३९.९
सोलापूर ३३९४ ५१.२
कोल्हापूर ४००२ ६३.३
सांगली २१७१ ३०.२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.