Rain News  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Rain : सोलापुरात मेच्या पावसाने मोडला १३२ वर्षांचा रेकॉर्ड

Rain News : दरवर्षी मे महिन्यामध्ये सोलापुरात अंगाची लाहीलाही करणारे ऊन असते. यावर्षी मात्र मे महिना सोलापूरसाठी सुखद गारवा, कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाचा ठरला आहे.

Team Agrowon

प्रमोद बोडके

Solapur News : दरवर्षी मे महिन्यामध्ये सोलापुरात अंगाची लाहीलाही करणारे ऊन असते. यावर्षी मात्र मे महिना सोलापूरसाठी सुखद गारवा, कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाचा ठरला आहे. जुन्या आणि नव्या पिढीला यंदाच्या मे महिन्यामधील पावसाचे अप्रूप वाटू लागले आहे.

सोलापुरात मे महिन्यात सर्वाधिक १४१.२ मिलिमीटर पावसाची नोंद यापूर्वी १८९३ मध्ये झाली होती. यंदाच्या मेमधील पावसाने तब्बल १३२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. मे महिना संपण्यापूर्वीच आतापर्यंत जिल्ह्यात १६५.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

कधी नव्हे ते यावर्षी तब्बल एक महिना आधी पावसाळा सुरू झाला आहे. अवकाळी पाऊस म्हणजे उन्हाचा कडाका वाढला की पाऊस पडतो आणि परत उन्हाचा कडाका वाढतो, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे.

यावर्षी मात्र ६ मेपासून आलेला अवकाळी पाऊस सलग तब्बल २० दिवस थांबला आहे. अजूनही पावसाचे वातावरण कायम आहे. यावर्षी मॉन्सून लवकर येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.

मॉन्सून येईपर्यंत यावर्षी अवकाळी पाऊस कायम राहिला. अंगाची लाहीलाही करणारा मे महिना २०२५ मध्ये सर्वांसाठी सुखद व अल्हाददायक गेला, ही आठवण पुढे अनेक वर्षे नक्कीच सोलापूरकरांच्या स्मरणात राहील.

मेमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद

मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात २४ तासात सरासरी ७६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद ४ मे १९६६ रोजी झाली आहे. एका दिवसातील जिल्ह्याच्या सरासरी पावसाचा हा विक्रम आजही कायम आहे.

सोलापुरात मे महिन्यात सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद यापूर्वी ३२.४ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते. यंदाच्या मे महिन्यात सर्वात कमी २८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदही २४ मे रोजी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले

MGNREGA Wages : पैसे द्या, पैसे द्या… ‘कुशल’चे पैसे द्या

Agriculture Electricity : शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये

Orange Orchard : बुरशीजन्य देठसुकी, फांदी मर, फळगळ व्यवस्थापन

Agriculture Scheme: केंद्र सरकारकडून ठिबक, तुषार सिंचनासाठी मिळणार ५५ टक्क्यांपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT