State of Maharashtra Agribusiness and Rural Transformation Project Agrowon
ॲग्रो विशेष

SMART Project: स्मार्ट’ला गती कमी, निधीही अपुरा – चार वर्षांत फक्त ६४२ कोटींची मदत

Maharashtra Farmer Scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) सुरू करण्यात आला असला, तरी निधीची टंचाई या योजनेला गती देण्यास अडथळा ठरत आहे. मागील चार वर्षांत अवघे ६४२ कोटी रुपये मिळाले असून, अजून १४५८ कोटी रुपये दोन वर्षांत मिळणे अपेक्षित आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि कृषी उद्योजकांना केंद्र स्थानी ठेवून स्पर्धात्मक व सर्वसमावेशक मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी मागील चार वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला मागील चार वर्षांत अवघे ६४२ कोटी रुपये मिळाले आहे. त्यापैकी अवघे ६०२ कोटी खर्च झाले असून अजून दोन वर्षांत तब्बल १४५८ कोटी रुपये मिळणे अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात ‘स्मार्ट’ हा जागतिक बँक अर्थासहित प्रकल्प मुख्यतः कृषी विभाग आणि अन्य संलग्न विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा कालावधी २०२० ते २०२७ असा असून प्रकल्पाची किंमत सुमारे २ हजार १०० कोटी रुपये इतकी आहे. यातील ७० टक्के हिस्सा जागतिक बँकेकडून कमी व्याजदरावर मिळणाऱ्या कर्जाच्या स्वरूपातील असून ३० टक्के राज्याचा स्वहिस्सा आहे.

स्मार्टतून शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत मूल्य साखळी विकासाचे उपप्रकल्प राबविले जाणार आहेत. या उप प्रकल्पांना प्रकल्प किमतीच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद स्मार्ट प्रकल्पात आहे. अशा उप प्रकल्पातून गोदाम, शीतगृहे, पॅक हाऊस, डाळ मील, ऑईल मील, अवजारे बँका, प्रक्रिया उद्योग या आणि अशा पायाभूत सुविधा शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभ्या केल्या जाणार आहेत.

‘स्मार्ट’ योजना दृष्टिक्षेपात

‘स्मार्ट’ची अंमलबजावणी २०२२ पासून राज्यातील ३४ जिल्ह्यांत वेगात सुरू

शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राधान्य.

शासनाकडून ५०४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदाला मंजुरी मिळाली.

सध्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जवळपास ४२५ ते ४५० पदावर म्हणजेच ८८ टक्के अधिकाऱ्यांची नियुक्ती.

शासनाच्या ११ विभागातर्फे अंमलबजावणी.

स्मार्ट प्रकल्प हा २०२० पासून सुरू झाला आहे. परंतु कोरोना काळ असल्याने या प्रकल्पाला फारशी गती मिळालेली नव्हती. त्यानंतर २०२२ पासून या प्रकल्पाला वेग आला आहे. आतापर्यंत सुमारे साडे सहाशे कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे.
उदय देशमुख, अतिरिक्त प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT