SMART Project : स्मार्टकडून उपलब्ध बाजारपेठेचा लाभ घ्यावा

Agriculture Scheme : नांदेड जिल्ह्यामध्ये केळी व हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी जागतिक बाजाराचा विचार करून निर्यातीच्या संधी सुद्धा शोधल्या पाहिजे.
Smart Project
Smart ProjectAgrowon
Published on
Updated on

Nanded News : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या बाजारपेठेच्या संधीचा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्यावतीने खरेदीदार विक्रेते संमेलनाचे आयोजन करण्यात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, लातूरचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर, डॉ. शिवाजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नीलेश देशमुख, दत्तगुरु फार्मर कंपनीचे (कळमनुरी) संचालक सूर्याजी शिंदे, शेतकरी मित्र फार्मर कंपनीचे संचालक प्रल्हाद इंगोले, हळद व भूसार खरेदीदार बद्रिनारायण मंत्री, गुट्टू शेठ मुरक्या, लातूरचे एडीएम राम शिनगारे, एमआयडीसी विभागीय व्यवस्थापक प्रल्हाद फड उपस्थित होते.

यावेळी खरेदीविक्रीबाबत शेतमालाचा दर्जा, मागणी-पुरवठा, शेतीचे अर्थशास्त्र, सोयाबीन, हळद, हरभरा इ. पिकांचे उत्पादन व विक्री बाबतीत खरेदीदार व विक्रेता यांच्यामध्ये चर्चा व करार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यापाऱ्यांसह ग्राहकांना ज्या दर्जाचा माल व ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्याप्रमाणे दिल्यास उत्पादक कंपनीला हवा तेवढा अथवा मागेल तसा दर मिळू शकतो.

Smart Project
Smart Project Subsidy : ‘स्मार्ट’च्या अनुदानाला जीएसटीमुळे कात्री

नांदेड जिल्ह्यामध्ये केळी व हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी जागतिक बाजाराचा विचार करून निर्यातीच्या संधी सुद्धा शोधल्या पाहिजे. त्याप्रमाणे बाहेर देशात देखील उत्पादक कंपन्याने अधिकाधिक माल निर्यात करावा असे ते म्हणाले.

संमेलनाची प्रस्तावना व उद्देश आत्माचे प्रकल्प संचालक (आत्मा) अनिल शिरफुले यांनी केली. स्मार्ट प्रकल्पाचे सादरीकरण भास्कर कोळेकर यांनी केले. लातूरचे विभागीय पुरवठा साखळी व मूल्यसाखळी तज्ञ जगदीशकुमार कांबळे यांनी खरेदीदारांचा सादरीकरणासह परिचय करून दिला.

Smart Project
Smart Farming : बाष्पीभवनाच्या अचूक अंदाजातून जलव्यवस्थापन

स्मार्ट प्रकल्पाचे सतीश महानवर, विभागीय एमआयएस संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी रोहित कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातील अधिकारी डॉ. आनंद गायकवाड, डीआययूचे वित्त सल्लागार राहुल लोहाळे, लेखापाल मुजीब उल रहेमान, दीपा भालके, एमआयएस अधिकारी डॉ. जी. एस. देशमाने उपस्थित होते.

१२ सामंजस्य करार

खरेदीदार व विक्रेते यांच्यात चर्चा घडवून आणून त्यांना एकाच मंचावर आमंत्रित करून हळद, सोयाबीन, हरभरा, तूर या पिकांच्या खरेदी विक्रीबाबत १२ सामंजस्य करार करण्यात आले. या संमेलनास जिल्ह्यातील कृषी, माविम, एमएसआरएल, पशुसंवर्धन प्रकल्प यंत्रणाअंतर्गत २१ समुदाय आधारित संस्थांच्या संचालकांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com