Silk Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Reshim Sheti : ऐन चंणचणीच्या काळात रेशीमशेतीचा हातभार

Silk Farming : लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील रेशीमशेती करणाऱ्या १४ शेतकऱ्यांनी १३.७१ क्विंटल रेशीमकोष विक्री करून तब्बल आठ लाख ६५ हजार रुपये मिळवले.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील रेशीमशेती करणाऱ्या १४ शेतकऱ्यांनी १३.७१ क्विंटल रेशीमकोष विक्री करून तब्बल आठ लाख ६५ हजार रुपये मिळवले. यातून आर्थिक टंचाईच्या काळात घरखर्च, शेतीखर्च आणि इतर गरजांसाठी रोख पैसा उपलब्ध झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. रेशीमशेती संकटातही आर्थिक आधार देते, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

महारेशीम अभियानांतर्गत एमआरजीएस तसेच ‘सिल्क समग्र दोन’ योजनेच्या साहाय्याने जोमेगाव येथील ३० शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षांपासून हे शेतकरी रेशीम कोष उत्पादनात यश मिळवत असून, यंदाही चांगले उत्पन्न मिळाले आहे. मागील मे महिन्यांत तुतीची छाटणी करून दीड महिन्यानंतर शेतकऱ्यांनी रेशीम कोष संगोपनास सुरुवात केली. सुमारे २२ ते २८ दिवसांत उत्कृष्ट दर्जाचे कोष तयार झाले.

विक्रीसाठी बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कर्नाटकातील रामनगरम बाजारात हे कोष नेण्यात आले. एकूण १४ शेतकऱ्यांनी १३.७१ क्विंटल कोष विकले. या साठी प्रतिक्विंटल कमाल दर ६५ हजार रुपये, किमान ५९ हजार पाचशे रुपये आणि सरासरी ६३ हजार रुपये असा दर मिळाला.

या विक्रीतून शेतकऱ्यांच्या हाती आठ लाख ६५ हजार रुपये आले आहेत. ऐन टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून मोठा दिलासा मिळाला आहे. रेशीमशेतीचे कमी कालावधीतील उत्पादन, बाजारातील मागणी व तुलनेने स्थिर दर यामुळे अनेक शेतकरी आता या व्यवसायाकडे वळत असून, खरिपातील आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठी रेशीमशेती एक पर्याय ठरत आहे. वर्षभर चालणाऱ्या रेशीम शेतीतून गावातील अनेक महिला, पुरुषांना रोजगार उपलब्ध होत आहे.

शेतकरी निहाय उत्पन्न (रुपये)

दाजीराव दिगंबर शिंदे : २,२०,०००, माधवराव काळबा शिंदे : २५,०००, दशरथ किशन शिंदे : ४०,०००, विनोद मधुकर शिंदे : ७०,०००, बालाजी माधवराव शिंदे : ७०,०००, मारुती संभाजी शिंदे : ६७,०००, विठ्ठल मारुती शिंदे (देशाई) : १,१०,०००, अविनाश अच्युत शिंदे : ३२,०००, विश्‍वास कोंडिबा गव्हाणे : ७४,०००, रामेश्वर पांडुरंग शिंदे : ५६,०००, शंकुतला मारोती पांचाळ : ५०,०००, देविदास दिगंबर शिंदे : ६९,०००, नंदाबाई परसराम कापसे : ३३,०००, गोपीराव प्रभाकर शिंदे : २३,०००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: संपूर्ण कर्ज माफ करा: अजित नवले

Maharashtra Budget 2026: विकासाचे मृगजळ

Revenue Camp: बारामतीत ‘महसूल समाधान शिबिर’ अभियानास आजपासून प्रारंभ

Farm Loan Controversy: शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी

Dimbhe Dam: डिंभे धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT