Pune News: डिंभे (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात गुरुवारी (ता. ५) सकाळी सहा वाजता ७.३९४ टीएमसी म्हणजेच ५९.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणाच्या डावा कालव्यातून ६७५ व उजव्या कालव्यातून २०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. .यंदा धरण २८ सप्टेंबरला १०० टक्के भरले होते. परंतु सध्या धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी धरणात ५० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठ्यात ९ टक्क्यांनी वाढ दिसून येत असली तरी धरणातील पाणी एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे..Ujani Dam Water Release: उजनीचे पाणी आळगे-खानापूरमार्गे हिळ्ळी बंधाऱ्याकडे.कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण म्हणून डिंभे हे धरण आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना वरदान ठरले आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रातील सुमारे सात हजार ४४८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे..Dimbhe Dam: डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले.जिल्ह्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे या पाच प्रमुख धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार करण्यात आला असून पाच मार्च रोजी सकाळी सहा वाजता कुकडी प्रकल्पाचा एकूण ५७.६२ टक्के म्हणजेच १७.१०१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे..कुकडीच्या धरणांतील गुरुवारचा साठाधरण टक्केवारी टीएमसीडिंभे ५९.१८ ७.३९४वडज ७१.२८ ०.८३६येडगाव ९१.४९ १.७७८माणिकडोह ४७.९४ ४.८७९पिंपळगाव जोगे ५६.८७ २.२१२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.