Sericulture Farming: काटेकोर व्यवस्थापनातून दर्जेदार चॉकी निर्मितीवर भर

Sericulture Production: परभणी जिल्ह्यातील देऊळगाव गात (ता. सेलू) येथील संजय पांडुरंग नाईकवाडे यांनी अनुभवातून रेशीम शेतीमध्ये चांगला जम बसविला आहे. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी चॉकीला असलेली मागणी लक्षात घेऊन त्यांनी चॉकी रेअरींग सेंटर केंद्र सुरू केले आहे.
Sericulture Farming
Sericulture FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Management:

शेतकरी नियोजन । रेशीमशेती

शेतकरी : संजय नाईकवाडे

गाव : देऊळगाव गात, ता. सेलू, जि. परभणी

एकूण क्षेत्र : ३ एकर

तुती लागवड : १ एकर

परभणी जिल्ह्यातील देऊळगाव गात (ता. सेलू) येथील संजय पांडुरंग नाईकवाडे यांनी अनुभवातून रेशीम शेतीमध्ये चांगला जम बसविला आहे. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी चॉकीला असलेली मागणी लक्षात घेऊन त्यांनी चॉकी रेअरींग सेंटर केंद्र सुरू केले आहे. सध्या काटेकोर व्यवस्थापनातून दर्जेदार चॉकीची निर्मिती करून मागणीनुसार रेशीम उत्पादकांना पुरवठा करण्यात त्यांनी सातत्य राखले आहे.

Sericulture Farming
Sericulture Farming : एकेकाळी केली रोजंदारी रेशीम उद्योगातून घेतली भरारी

दर्जेदार रेशीम उत्पादन

संजय पांडुरंग नाईकवाडे यांची परंपरागत ३ एकर शेती आहे. गावातील रेशीम उत्पादकांकडून प्रेरणा घेत संजय रेशीम शेतीकडे वळले. २००५ मध्ये एक एकरावर तुतीच्या व्ही-१ या वाणाची लागवड केली. त्यानंतर १० बाय १५ फूट आकाराचे रेशीम कीटक संगोपनगृह उभारले. यामध्ये वर्षभरात रेशीम कोष उत्पादनाच्या ५ ते ६ बॅच घेतल्या जातात. ७५ ते १०० अंडीपुंजाच्या बॅचपासून ६० ते ६५ किलो रेशीम कोष उत्पादन मिळत असे. पाच वर्षांच्या अनुभवातून रेशीम शेतीमध्ये चांगला जम बसला.

रेशीम उत्पादनात वाढ करण्यासाठी २०११ मध्ये २० बाय ५० फूट आकाराचे आणखी एक संगोपनगृह उभारले. त्यामुळे प्रति बॅच १५० अंडीपुंजाची बॅच घेणे शक्य होऊ लागले. त्यातून प्रतिबॅच १२० ते १२५ किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन मिळू लागले. उत्पादित कोषाची बंगळूर जवळील रामनगरम येथील मार्केटमध्ये विक्री केली जायची. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी चॉकीला चांगली मागणी असते. ही बाब ध्यानात घेऊन २०१५ मध्ये रेशीम कोष उत्पादन बंद करून बाल्य रेशीम कीटक (चॉकी सेंटर) निर्मिती केंद्र सुरु केले.

चॉकी रेअरिंग सेंटरची सुरुवात

चॉकी रेअरिंग सेंटरची सुरुवात करण्यापूर्वी आंध्रप्रदेश येथील हिंदपूरमध्ये जाऊन बाल्य रेशीम कीटक निर्मिती व संगोपन या विषयीचे ९० दिवसांचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला १० फूट बाय साडे बारा फूट आकाराच्या जागेत चॉकी रेअरींग सेंटर सुरु केले. त्यानंतर जागा वाढवीत पदरमोड करून २०२२ मध्ये ३२ बाय ४२ फूट जागेत अद्ययावत चॉकी रेअरींग सेंटर उभारले. त्यात १० बाय साडेबारा फूट आकाराची हॅचिंग रूम, भांडार खोली, प्रतिक्षालय आदींचा समावेश आहे.

Sericulture Farming
Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

चॉकी रेअरींग सेंटरमध्ये सुमारे ४००० ते ६००० अंडीपुंजाची एक बॅच घेतली जाते. रेशीम उत्पादकांकडून त्यांच्या बॅच नियोजनानुसार साधारण १२ ते १५ दिवस आधी चॉकीची मागणी नोंदविली जाते. प्रत्येकी १०० अंडीपुंजाचे १० ट्रे मध्ये पॅकिंग करून मागणीनुसार शेतकऱ्यांना चॉकीचा पुरवठा केला जातो. दर्जेदार तुती उत्पादन, संगोपनगृहात योग्य तापमान व आर्द्रता, निर्जंतुकीकरण यावर विशेष भर दिला जातो. त्यातून दर्जेदार चॉकी उत्पादन मिळण्यास मदत होते. परभणी, जालना, बीड जिल्ह्यातील रेशीम उत्पादकांना चॉकीचा पुरवठा केला जातो. खर्चजाता चांगले उत्पन्न हाती येते, असे संजय नाईकवाडे सांगतात.

तुती बाग व्यवस्थापन

वर्षभर चॉकी निर्मिती सुरू ठेवण्यासाठी संजय यांच्याकडील शेती तुती लागवडीसाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे तुती लागवडीसाठी अडीच एकर क्षेत्र भाडेतत्वावर घेण्यात आले. नियमित तुती बागेची छाटणी, आंतरमशागत, पाणी, अन्नद्रव्ये व्यवस्थापन यावर भर देण्यात आला. जमीन भारी प्रकारची असल्यामुळे तुतीचे दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत झाली. उन्हाळ्यात बागेत आच्छादनाचा वापर केला जातो. बागेत काटेकोर व्यवस्थापनाला प्राधान्य दिल्यामुळे रेशीम कीटकांसाठी दर्जेदार पाल्याची उपलब्धता होते.

मागील कामकाज

वाढत्या तापमानाचा तुती झाडांवर परिणाम होऊ नये यासाठी मार्च अखेरीस गव्हाचा भुस्सा आच्छादन म्हणून तुती बागेत टाकण्यात आला. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले.

एप्रिल महिन्यात दोन हजार अंडीपुंजाची बॅच पूर्ण झाली. त्यानंतर मे महिन्यात मागणी कमी असल्यामुळे बॅच घेणे बंद ठेवण्यात आला.

दरम्यानच्या काळात संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले.

१० मे रोजी तुती बागेची छाटणी करण्यात आली. त्यानंतर ५ ट्रॉली शेणखत देऊन मशागत केली.

मशागत केल्यानंतर १०ः२६ः१६ आणि युरिया खताची मात्रा दिली.

मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस सुरु झाल्यामुळे पाणी देण्याची गरज पडली नाही.

आगामी नियोजन

नवीन बॅच नियोजनानुसार २५ मे रोजी जालना येथे दोन हजार अंडीपुंजाची मागणी नोंदविली होती. हे अंडीपुंज १ जूनला उपलब्ध झाले. त्यांचे ५ जूनच्या दरम्यान हॅचिंग झाले.

या बॅचमधील पहिली अवस्था पूर्ण झाली आहे. साधारण १२ जूनच्या दरम्यान मागणीनुसार रेशीम उत्पादकांना अंडीपुंज वितरण करण्यात येईल.

पुढील बॅचसाठी आणखी २ हजार अंडीपुंजाची मागणी बेंगलोर येथे केली आहे. दरवर्षी साधारणपणे २५ जूननंतर चॉकीची मागणी वाढते. यावर्षी देखील मागणी वाढल्यानंतर ४५०० ते ६००० अंडीपुंजाची बॅच घेण्याचे नियोजन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com