Pune News: अर्थसंकल्पातील दोन लाख रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टीका शेतकरी संघटनांनी केली आहे. यामुळे केवळ विकास सोसायट्यांची कर्जमाफी होणार असून, पतसंस्था, राष्ट्रीय बँका, खासगी बँका यांची मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्जे तशीच राहणार आहेत. ट्रॅक्टर, विहिरी, अवजारे यासाठीची कर्जे कायम राहणार असल्याने शेतकरी कर्जाच्या बोजाखालीच राहणार असल्याची टीका त्यांनी केली आहे..२०२५ च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अर्थसंकल्पात जी कर्जमाफी जाहीर केली आहे ती तकलादू आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज अडीच ते तीन लाख रुपये आहे. आणि ते थकीत असून, व्याजासह ते साडेतीन लाखांपर्यंत गेले आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.राजू शेट्टी, माजी खासदार आणि नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना.Maharashtra Agri Budget: अर्थसंकल्पात कृषी यांत्रिकीकरणाला बगल.शेतकऱ्यांना फळपिकांशिवाय इतर कृषी उत्पन्नापासून उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण व्हावा आणि पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन व्हावे, यासाठी बांबू धोरणाला गती देण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, याचे आम्ही स्वागत करतो. बांबू केवळ उत्पादन करून चालणार नाही, तर त्याची मूल्यसाखळी विकसित करण्याची घोषणा केली आहे.पाशा पटेल, अध्यक्ष, कृषिमूल्य आयोग.सरकारने दोन लाखांच्या पीक कर्जमाफीची घोषणा करून, सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. बजेटची चर्चा फक्त कर्जमाफीभोवती फिरत राहणार आहे. मात्र प्रत्यक्षात शेती क्षेत्रासाठीच्या तरतुदी अत्यंत त्रोटक आहेत. तसेच ही कर्जमाफी केवळ पीककर्जाची आहे. यातून केवळ विकास सोसायट्यांची कर्जमाफी होईल. मात्र पतसंस्था, खासगी बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका यांची कर्जे तशीच यामुळे या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. रघुनाथदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना.Maharashtra Agriculture Budget: शेती क्षेत्राच्या वाट्याला कोरडे नक्षत्र.खरिपात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज हे मार्चमध्ये थकीत होते. त्यामुळे हा शुद्ध धोका आहे. परिणामी मार्चमध्ये थकीत कर्ज होणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, याबाबत सरकारने स्पष्टता केलेली नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार. मात्र एखाद्या शेतकऱ्याकडे तीन लाख रुपयांचे कर्ज असल्यास त्याने एक लाख रुपये भरण्याची तयारी दर्शविल्यास त्याला उर्वरित दोन लाखांचा लाभ मिळणार का, याबाबत ही स्पष्टता नाही.विजय जावंधिया, शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक.कर्जमाफीपूर्वी बँकांकडून कर्जदार आणि नियमित कर्जदारांची माहिती भरून घेण्यात आली. त्याकरिता कर्जदारांसाठी ८४ रकाने होते, तर नियमित कर्जारांसाठी ४४ रकान्यांमध्ये माहिती भरून द्यायची होती, असे एका ओळखीतील बँक अधिकाऱ्याने सांगितले. त्यावरूनच शासन पात्र, अपात्रतेच्या निकषातच ही कर्जमाफी गुंडाळणार आहे. द्राक्ष व इतर फळपीक उत्पादकांचे कर्ज हे चाळीस-पन्नास लाखांच्या घरात राहते. त्यांचाही विचार कर्जमाफीत झाला नाही.अनिल घनवट, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.