Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : भात कापणीसाठी मजूरटंचाईच्या झळा

Labor Shortage : चालूवर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने भात लागवडी लांबणीवर गेल्याने हंगामी कामकाज प्रभावित झाले. त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात एकदाच कापणीची लगबग सुरू झाली.

मुकूंद पिंगळे

Nashik News : चालूवर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने भात लागवडी लांबणीवर गेल्याने हंगामी कामकाज प्रभावित झाले. त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात एकदाच कापणीची लगबग सुरू झाली. मात्र कापणीसाठी मजूर मिळत नाहीत. अधिक मजुरी देऊनही भात कापणीसाठी मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे.

आदिवासी भागातील मजूर शहरी भागात अधिक मजुरी मिळत असल्याने स्थलांतर करत आहेत. त्यामुळे यंदा भात उत्पादक पट्ट्यातील कामे अडचणीत आहेत. उशिराने पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, पेठ सुरगाणा या तालुक्यांत रोपे वेळेवर तयार होऊनही वेळेवर लागवड झालेली नाही.

काही ठिकाणी दुबार रोपे तयार करून शेतकऱ्यांनी लागवडी पूर्ण केल्या. मात्र आता दिवाळीच्या दरम्यान एकदाच सर्वत्र कापणी आल्याने धावपळ सुरू आहे. त्यातच मजूरटंचाई जाणवत आहे. यंदा १०० ते १५० रुपयांनी रोजंदारी वाढली आहे.

तरीही मजुरांची शोधाशोध सुरू आहे. आदिवासी भागातील मजूर गिरणारे भागातून शहरात कामासाठी जातात. याशिवाय कंत्राटी पद्धतीने औद्योगिक वसाहतीत हे मजूर दाखल झाले आहेत. तरुण वर्ग नोकरीला अधिक पसंती देत असल्याने शेतमजुरांची संख्या ग्रामीण भागात कमी झाली आहे. भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे; मात्र अनेक ठिकाणी जमीन उंच-खोल असल्याने यंत्र चालवण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यासही मर्यादा आहेत.

मजुरीची स्थिती(प्रतिदिवस मजुरी रुपये)

पूर्वी...२०० ते २५० रुपये

आता...३५० ते ४०० रुपये

दिवाळी झाल्यानंतर मजूर हंगामी कामांसाठी बागायती भागामध्ये तसेच शहरी भागात जात आहेत. त्यामुळे अडचणी येतात. अधिक मोबदला देऊनही मजुर मिळत नाहीत. त्यामुळे भातशेती दिवसेंदिवस अडचणीची ठरत आहे.
- यशवंत गावंडे, प्रगतिशील शेतकरी, गावंधपाडा, ता. पेठ.
अगोदरच खर्च वाढला आहे. त्यात परतावा मिळत नाही. लागवडीपासून तर काढणीपर्यंत मजुरांची टंचाई जाणवत आहे. घरच्याघरी कापणी करण्याचा प्रयत्न आहे. दुसरा पीक पर्याय नाही, त्यात खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अडचण आहे.
- अंकुश महाले, भात उत्पादक, वांजोळे, ता. इगतपुरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT