Paddy Harvesting : डोक्यावरील भाताचे भारे उतरले

Paddy Farming : दिवाळीमध्ये अथवा दिवाळी संपताच रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र भातकापणी सुरू होत असते. भातकापणी झाल्यावर पेण, पनवेल या भागात त्वरित भात झोडणी केली जाते.
Paddy
Paddy Agrowon
Published on
Updated on

Mahad News : शेतमजुरांची दिवसेंदिवस जाणवणारी कमतरता, काही अंशी कमी झालेली मेहनत व गावोगावी उपलब्ध झालेले रस्ते व मालवाहनांची सुविधा यामुळे ग्रामीण भागात भाताचे भारे डोक्यावरून वाहण्याचे दिवस मागे पडू लागले आहेत. हे भारे वाहून नेण्यासाठी आता वाहनांचा वापर होऊ लागला आहे.

दिवाळीमध्ये अथवा दिवाळी संपताच रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र भातकापणी सुरू होत असते. भातकापणी झाल्यावर पेण, पनवेल या भागात त्वरित भात झोडणी केली जाते. परंतु दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, श्रीवर्धन या भागामध्ये भातकापणी झाली की, भारे बांधले जातात.

Paddy
Paddy Crop Damage : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने भाताचे नुकसान

त्यानंतर हे भारे डोक्यावरून वाहून एका जागी रचून ठेवतात. त्याला उडवी असे म्हणतात. ही उडवी प्रत्येक जण आपल्या सवडीनुसार काढतो. त्यानंतर भात झोडण्याची कामे केली जातात. सध्या भातकापणीची कामे वेगाने सुरू आहेत.

उडव्याही रचल्या जात आहेत. भातकापणीच्या कामासाठी शहरात नोकरीसाठी असलेले चाकरमानेही विशेष सुट्टी घेऊन येत असतात. मात्र, मजुरांची कमतरता आणि वेळेचे भान राखून माल वाहनांचा आधार त्यांना घ्यावा

Paddy
Paddy Crop Damage : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना फटका

लागत आहे.पूर्वी काही भागांमध्ये शेताच्या बांधावरून व रस्त्यांवरून एका रांगेत भाताचे भारे वाहून नेणारे शेतकरी व त्यांचे कुटुंब दिसत असे. परंतु आता काळानुसार हे चित्र मागे पडू लागले आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे शेतीमधील अंग मेहनतही कमी होऊ लागली आहे.

त्यामुळे डोक्यावरून भाताचे भारे वाहून नेण्याचे प्रमाण कमी होत आहे. सध्या ग्रामीण भागात रस्ते बनले असल्याने भारे वाहून नेण्यासाठी पर्याय म्हणून माल वाहनांचा वापर अधिक होत आहे. या वाहनांमधून भारे नेले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com