Solapur News: सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हा महामार्ग जिल्ह्यातील चार तालुक्यातील ६८ गावांतून जात आहे. आतापर्यंत ५६० हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून अद्याप १६७ हेक्टरचे संपादन बाकी आहे. संपादनापोटी शेतकऱ्यांना ४३१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून अद्याप १४७ कोटीचे वाटप व्हायचे आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे २४ कोटी ४५ लाखांची मागणी केली आहे. .केंद्र सरकारने सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डला मंजुरी दिली, त्यासाठी संपादन प्रक्रियाही सुरू करण्यात आली. महाराष्ट्र वगळता शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेशात महामार्गाच्या कामास सुरुवातही झाली पण महाराष्ट्रातील सोलापूरसह धाराशिव, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात अद्याप संपादन प्रक्रिया रखडली आहे..Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्गाचे काम सुरूच; शेतकरी त्रस्त.सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील १९, बार्शी २०, दक्षिण सोलापूर १९ व उत्तर सोलापूर १० अशा एकूण ६८ गावांतून हा महामार्ग जात आहे. निधी मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे १०३ निवाडे पाठवण्यात आले होते, त्यापैकी ६५ निवाड्यांना निधी मिळाला आहे तर अद्याप ३८ निवाडे प्रलंबितआहेत..Surat-Chennai Greenfield Express Highway : महामार्गबधित शेतकऱ्यांना टोल कंपन्यांचे भागीदार करा.एकूण क्षेत्रापैकी ६५ टक्के क्षेत्राचे संपादन पूर्ण झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात ३५ हेक्टर, बार्शी ६४ हेक्टर, दक्षिण सोलापूर तालुक्यात ६५ हेक्टर तर उत्तर तालुक्यातील १.८० हेक्टरचे संपादन रखडलेआहे..६५ निवाडे मंजूर, ३८ प्रलंबित...राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे एकूण १०३ निवाडे सादर करण्यात आले होते, यापैकी ६५ निवाडे मंजूर झाले असून ३८ प्रलंबित आहेत. यामध्ये अक्कलकोट तालक्यातील ९, बार्शी ७, दक्षिण सोलापूर १५ व उत्तर सोलापूर तालुक्यातील एका निवाड्याचा समावेश आहे..१४८१ गटांतील ७२८ हेक्टरसाठी ५७८ कोटी मंजूरअक्कलकोट तालुक्यातील ५३९ गटातील २९७ हेक्टरसाठी २२३ कोटी, बार्शी तालुक्यातील ५९२ गटातील १८७ हेक्टरसाठी १४८ कोटी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३४३ गटातील २३६ हेक्टरसाठी १९६ कोटी तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ७ गटातील ६.८० हेक्टरसाठी १० कोटी सोलापूर तालुक्यातील एका निवाड्याचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.