Ahilyanagar News: सध्याचा विचार केला तर ओढे, नाले, नद्या यांचे प्रदूषण होत आहे. दिवसेंदिवस जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन पीक उत्पादनात घट येत आहे. जमीन सुधारणेसाठी नैसर्गिक शेतीकडे वळून जमिनीचे आरोग्य पूर्वपदावर आणणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांनी केले..वरवंडी-बाभुळगाव (ता. राहुरी) येथे जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रम झाला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदिप लाटे, प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा राहुरीच्या सचिव डॉ. रितू ठाकरे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, शरद ढगे, गोरक्षनाथ गिऱ्हे यावेळी उपस्थित होते..Soil Health: काडीकचरा, पालापाचोळ्याचे कंपोस्ट रूपांतर शेतातच करणे फायदेशीर .डॉ. बोडके म्हणाले, शेतीयोग्य जमिनीवर शहरे वसत आहेत. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊन मातीबरोबरच अन्नद्रव्येदेखील वाहून जात आहेत. यामुळे ओढे, नाले, नद्या यांचे प्रदूषण होत आहे. दिवसेंदिवस जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन पीक उत्पादनात घट येत आहे..Soil Health: मानवाच्या आरोग्यासाठी जमिनीचे आरोग्य जपा : नानोटे.बदलत्या हवामान परिस्थितीत रसायनविरहीत अन्ननिर्मिती, जमिनीची उत्पादकता पूर्व पदावर आणणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना कायम विद्यापीठाच्या संपर्कात राहून आपला जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा. आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावे व विद्यापीठातील शास्त्रज्ञ व संशोधकांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी जेष्ठ मृदशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, प्रदिप लाटे, दिगंबर अडसुरे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. रितू ठाकरे यांनी, सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले तर आभार बापूसाहेब शिंदे यांनी मानले..सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. जमिनीमध्ये मुळांभोवती सूक्ष्म जीवाणूंचे संवर्धन करा, जमिनीचे आरोग्य वाढवा. कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि कृषि विद्यापीठांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त महाविस्तार मोबाईल ॲप प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भ्रमणध्वनीमध्ये घेऊन त्याचा वापर करण्याची गरज आहे.सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.