Maratha reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : शेतकरी आंदोलन आणि मराठा आरक्षणावरून शरद पवार, संजय राऊत आणि नाना पटोले यांचा सरकारवर घणाघात

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काल मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा झाली. यानंतर हे आरक्षण मान्य नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. तिकडे दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे.

मराठा आरक्षण आणि शेतकरी आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते खासदार शरद पवार, उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी  राज्य सरकारवर हल्लाबोल करत सवाल केले आहेत. शरद पवार यांनी कोल्हापूर, संजय राऊत यांनी मुंबई आणि नाना पटोले यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत आज बुधवार (ता.२१) सरकारला प्रश्न विचारले आहे. 

मराठा आरक्षणासाठी काल मंगळवार (ता.२०) विशेष अधिवेश घेण्यात आले होते. हे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात देखील मंजूर झाले असून मराठा समाजाला १० आरक्षण देण्यावर एकमत झाले आहे. मात्र मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त करत सगेसोयरेवरून आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरून आणि शेतकरी आंदोलनावरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी कांदा निर्यात बंदीवरून केंद्रावर जोरदार टीका केली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली नसून ती आद्यापही कायम ठेवली आहे. केंद्राचा कांदा निर्यात बंदीचा निर्णयच चुकीचा असल्याचे ते म्हणालेत. याबरोबर राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण टीकलं तर आनंद होईल असेही पवार यांनी म्हटले आहे.  

मंत्री रस्त्यावर नाचणार आहेत का? 

आरक्षणचा विषय म्हणजे सरकारकडून फसवा फसवीचा खेळ असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भाजप हा पक्षच फसवा फसवीच्या पायावर उभा असून मराठा समाजाबाबत सरकारने फसवणुकीचा प्रकार केल्याची टीका राऊत यांनी केली आहे. हाच खेळ मराठा समाजाला मान्य नाही. राज्यात उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर मंत्री रस्त्यावर नाचणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. 

गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी

त्याचबरोबर राऊत यांनी, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी, शेतकरी हा किमान आधारभूत किंमतीवरून दिल्लीच्या सिमेवर गेला आहे. ते ठाम आहेत. मात्र त्यांना रोखण्यासाठी सशस्त्र सेना तैनात करण्यात आलेली आहे. जर शेतकरी पुढे गेलाच तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची सरकारने तयारी केल्याची गुप्त माहिती आपल्याकडे आहे असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

अदाणीला देण्यासाठी लाखो हजारो कोटी, पण...

केंद्राकडे अदाणीला देण्यासाठी लाखो हजारो कोटी आहेत. तसे व्यवहार केले जाता आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी सव्वादोन कोटी लाख नाहीत. यासाठी तरतूद करण्यास केंद्रातील मोदी सरकार तयार नाही, असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

याबरोबर राज्यात कांदा निर्यातीवरून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. 

न्यायालयात टिकेल का? 

यादरम्यान मराठा आरक्षणावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका करताना प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे.

पण हे आरक्षण सरकाने घाईगडबीने दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणे महत्वाचे आहे. ते टिकणार का? असा सवाल सरकारला पटोले यांनी केला आहे. जर हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही तर मराठा समाजाची घोर फसवणूक होईल असेही पटोले यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT