Maratha Reservation : '...ज्या ठिकाणी जाहिरात निघेल तिथे आरक्षण लागू' : फडणवीस 

Devendra Fadnavis on Maratha Reservation : राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाबाबत विधेयक मांडले. जे एकमताने मंजूर झाले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण घोषित केले आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation Agrowon

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले. विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले आहे. मराठा समाजाला मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक असे १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता ज्या ठिकाणी जाहिराती निघतील त्याठिकाणी मराठा आरक्षण लागू असेल." असं फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल  नार्वेकर, विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

मराठा आरक्षणाचे विधेयक

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण घोषित झाल्यावरून सत्ताधारी आमदारांकडून विधानभवन परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, आता मराठा आरक्षणाचे विधेयक पास झाला आहे. त्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी जाहिराती निघतील त्याठिकाणी मराठा आरक्षण लागू होईल. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने विधीमंडळात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारे विधेयक मांडले. जे दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असे फडणवीस म्हणाले.

Maratha Reservation
Maratha Reservation : विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण एकमताने मंजूर!

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही

न्यायालयाने आरक्षणावर निर्णय देताना काही त्रुटी काढल्या सांगितल्या होत्या. त्याच त्रुटींवर राज्य सामागासवर्ग आयोगाने काम केले आहे. साडे तीन लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी अविरत पणे काम करून मराठा आरक्षणासाठी अहवाल तयार केला. जो आज शिफारसींसह मंत्री मंडळाने स्वीकारला आहे. तर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे म्हटले आहे.

एकमताने विधेयकाला पाठिंबा

तसेच सर्व्हेच्या आधारावर मराठा समाजाला असे आरक्षण देणे, योग्य ठरेल, असा अहवाल न्यायमूर्ती शुक्रे यांचा अहवाल होता. मी राज्य मागासवर्गीय आयोगाचा आभारी आहे. विरोधी पक्षांचे देखील आभार मानतो त्यांनी एकमताने या विधेयकाला पाठिंबा दिला. शिवाय कर्मचाऱ्यांचेही आभार मानतो त्यांनी सर्वेसाठी दिवसरात्र काम केले. या अहवालानंतरच आम्ही १० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला होता. जो दोन्ही सभागृहांनी मंजूर केला. विरोधी पक्षाचे काम विरोध करणे असताना त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याचे फडणवीस म्हणाले.  

योग्य खबरदारी घ्यावी लागते

मराठा समाजाला पूर्वी दिलेल्या १६ टक्के आरक्षणावर फडणवीस म्हणाले, सर्वात आधी मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना १६ टक्के आरक्षण दिले होते. जे न्यायालयाने नाकारले होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे निकष आणि पाहणीतून तो निकाल दिला होता. पण आता आरक्षणाची टक्केवारी ठरवताना योग्य खबरदारी घ्यावी लागते, असेही फडणवीस म्हणालेत.

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सुरू

तसं पुन्हा व्हायला नको

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच दुसऱ्यांच्या हक्कांवर गदा न आणता आरक्षणाची हमी सरकारने घेतली. फक्त आता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर जो लाठीचार्ज झाला तसं पुन्हा व्हायला नको असे उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. 

त्यांची ओळख असती तर 

तमाम मराठा बांधवांसाठीचा जो ठराव होता तो एकमताने सगळ्यांनी मंजूर केला. मला खात्री आहे की हे टिकणारं आरक्षण असेल. मी मराठा समाजाचं अभिनंदन करतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, मी आत्ता तरी सरकाच्या हेतूवर संशय घेणार नाही. कारण मराठा समाजातल्या अनेकांनी यासाठी बलिदान दिले आहे हे नाकारता येणारे नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.  

छगन भुजबळ यांचा सवाल

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी, मला मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही. पण धमक्या देणाऱ्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरुन शिव्या देणाऱ्या जरांगेंना अटकाव करणार आहात की नाही? असा सवाल केला आहे. जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या खाली बसून महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर यांना शिव्या देताता. ही दादागिरी काय चाललीय? ते राज्यात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. हे थांबायला पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com