Shaktipeeth Highway  Agrowon
ॲग्रो विशेष

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग करायचा असेल तर करा आणि आमचे पंढरपूरकडे स्थलांतर करा, अशा उद्विग्न भावना त्यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केल्या.

sandeep Shirguppe

Kolhapur Shaktipeeth Highway : कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान एकोंडी (ता. कागल) येथे शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडवला.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना का निघाली नाही? याचा जाब शेतकऱ्यांनी विचारला. तसेच शक्तिपीठ महामार्ग करायचा असेल तर करा आणि आमचे पंढरपूरकडे स्थलांतर करा, अशा उद्विग्न भावना त्यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केल्या.

पालकमंत्री मुश्रीफ एकोंडी येथे कार्यकर्त्यांची बैठक संपवून बामणी येथील भाजपच्या मेळाव्याकडे निघाले होते. त्यावेळी सिद्धनेर्ली ते एकोंडी मार्गावर हे शेतकरी ठिय्या मांडून बसले होते. मुश्रीफ यांनी कोल्हापूर वगळून शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना न निघाल्यास मी राजीनामा देईन, असे सांगितले.

शेतकऱ्यांनी या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाचे झालेले चिन्हांकन दाखवले. त्यावर मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्ग मला तोंडपाठ आहे. कोणत्याही परिस्थितीत तो होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. 

यावेळी आनंदा पाटील, विष्णू वैराट, दिनकर लोंढे, सुभान वैराट, यशवंत मर्दाने, बाळासो लोंढे, संतोष लोंढे, यशवंत सुळगावे, विष्णू सुळगावे, पांडुरंग पाटोळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT